Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

“शरद पवार पाठीमागच्या बाजूने भाजपला सपोर्ट करत आहेत”

मुंबई | केंद्र सरकारनं नुकतीच अतिशय महत्वाची तीन विधेयकं सादर केली आहेत. बाजार समिती नियमनमुक्ती विधेयक, अत्यावश्यक वस्तू व सेवा सुधारणा कायदा आणि करार शेती विधेयक अशी ही तीन विधेयकं आहेत. केंद्र सरकारनं सादर केलेल्या या विधेयकांवरुन देशात चांगलाच गदारोळ उडाला आहे. ही विधेयकं शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचं केंद्र सरकार सांगत आहे. मात्र, या विधेकाविरोधात देशातील शेतकरी रस्त्यावर उतरू लागले आहेत.

केंद्र सरकारनं सादर केलेली ही विधेयकं शेतकऱ्यांच्या पूर्ण विरोधी असल्याची विरोधी पक्षातील नेत्यांचं म्हणनं आहे. मात्र, ही विधेयकं राज्यसभेत सादर होताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीच्या सरकारमधील महत्वाचा घटक असणारे शरद पवार चर्चेला अनुपस्थित होते. त्यामुळे शरद पवार या विधेयकात केंद्र सरकारला पाठींबा देत आहेत का?, असा प्रश्न सातत्यानं विचारला जात आहे.

देशातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं असणाऱ्या विधेकांवेळी शरद पवारांनी अशी भूमिका घेतल्यानं विरोधी पक्षातील नेत्यांनी पवारांवर सडकून टीका केली आहे. शरद पवारांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्येही पवारांविषयी संभ्रम तयार झाले आहेत. अशातच आता भाजप नेते नितेश राणे यांनी पवार आमच्यासोबत असल्याचा दावा केला आहे.

केंद्र सरकारनं सादर केलेल्या नवीन विधेयकांविषयी महिती देण्यासाठी नितेश राणे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. यावेळी राणे यांनी कृषी विधेयकांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे. ‘ये अंदर कि बात है, शरद पवार हमारे साथ है,’ असं विधान नितेश राणे यांनी यावेळी केलं आहे.

तसेच राणे यांनी यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी राज्यसभेत घेतलेल्या भुमिकेवरही भाष्य केलं आहे. प्रफुल पटेल राज्यसभेत बोलले खरे मात्र त्यांनी विधेयकांला विरोध केला नाही. प्रफुल पटेल यांनी केवळ सभात्याग केला, असं नितेश राणे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या कृषी विधेयकांवरून राज्यसभेत प्रचंड गोंधळ उडाला होता. विरोधी पक्ष नेत्यांनी या विधेयकांवरून राज्यसभेतील माईक तोडले, कागदपत्रे फाडत धक्काबुक्की केली, असं अभूतपूर्व नाट्य राज्यसभेत यावेळी घडलं होतं. मात्र, राज्यसभेत विरोधकांना न जुमानता सरकारनं प्रचंड गोंधळात हे विधेयक मंजूर करून घेतलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

करण जोहर पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, “माझा त्या प्रकाराशी काहीही संबंध नाही”

दीपिका पदुकोणची 100 कोटी किंमतीची ‘ही’ गोष्ट सापडलीय संकटात?

कशाला घाबरतोय सलमान खान? सलमाननं स्वतःच केला मोठा खुलासा म्हणाला…

कंगना राणावत आणि महेश भट्ट यांचा ‘तो’ फोटो व्हायरल, राखी सावंत म्हणाली…

दीपिकाच्या ‘त्या’ व्हॉट्सअप ग्रुपबाबत मोठी माहिती समोर, ज्यामध्ये लिहिलं होतं ‘माल है क्या?’