“महाराष्ट्रात दंगली करणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घाला, अन्यथा…”

मुंबई | त्रिपुरातील एका रॅलीत पैगंबराबद्दल अपशब्द वापरण्यात आल्याने महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे अमरावती, मालेगाव, भिवंडीत आणि नांदेडमध्ये प्रचंड मोर्चे काढण्यात आले. अमरावतीत या घटनेचे हिंसक पडसाद उमटल्याने अमरावतीतील परिस्थिती तणावपूर्ण आहेत.

हजारो मुस्लिम बांधव एकत्र गोळा झाले आणि त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना वाटतेतील दुकाने जबरदस्थीने बंद करण्यात आली. दुकाने बंद करण्यास नकार दिल्याने दुकानांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

महाराष्ट्राच्या काही शहरामध्ये काल दंगलसदृश्य स्थिती होती. या सर्व घटनेच्या पाठीमागे रजा अकादमी असून तिच्यावर बंदी घाला, नाही तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

नितेश राणे यांनी सकाळी ट्विट करत सरकार तसच रजा अकादमीला टार्गेट केलंय. महाराष्ट्राच्या विविध भागात जी हिंसा आणि दंगल उसळली त्याच्या पाठीमागे अतिरेकी संघटना रजा अकादमीच आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

प्रत्येक वेळेस ते शांतता भंग करतात, सर्व नियम पायदळी तुडवतात आणि सरकार बसून राहतं, बघत बसतं. सरकारनं एक तर यांच्यावर बंदी घालावी अन्यथा, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू, असा इशारा देखील नितेश राणेंनी दिला आहे.

दरम्यान,त्रिपुरामध्ये जमावानं मशिद पेटवल्याची अफवा महाराष्ट्रात पसरली. त्याच्या निषेधार्थ काल विविध ठिकाणी मुस्लिम मोर्चे काढले गेले. त्यात अमरावती, नांदेड, भिवंडीत जमाव हिंसक झाला.

अमरावतीत तर जमावानं 20-20 दुकानं फोडली, दुचाकी तोडल्या. पोलीसांवर दगडफेक केली. बघता बघता महाराष्ट्राच्या काही शहरात दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली.

भिवंडी-नांदेडमध्ये रजा अकादमीच्याच काही तरुणांनी कायदा हातात घेऊन दगडफेक केल्याचा आरोप आहे. नांदेडच्या एसपींनी ह्या घटनेला दुजोरा दिलाय.

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

“आपण कॅशलेस नाही तर लेसकॅश अर्थव्यवस्था झालोत” 

“एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सूचतात” 

पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 

“कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही”

‘लस न घेतलेल्या नागरिकांना…’; छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य