“ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून राज्याला पनवती लागली”

मुंबई | भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील ठाकरे सरकार हे चपट्या पायाचं सरकार आहे. हे सरकार आल्यानंतर गेल्या दोन वर्षापासून राज्याला पनवती लागली आहे, अशी बोचरी टीका नितेश राणेंनी केली आहे.

ठाकरे सरकारवर सरकारवर कोणीही अपेक्षा ठेवू शकत नाही. मराठा आरक्षणाच्या विषयावर या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. लोकांना फसवले आहे. त्यामुळे मराठा समाजाने या सरकारकडून नेमकी काय अपेक्षा ठेवावी, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

नितेश राणेंनी ठाण्यात पत्रकार परिषदत घेत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव संदीप लेले, सरचिटणीस विलास साठे, उपाध्यक्ष सागर भदे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना नितेश राणेंनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

माझं मराठा समाजाच्या तरुण-तरुणींनी ही दोन वर्षे नजरेसमोर ठेवली पाहिजेत. ठाकरे सरकारला आर्यन खानची चिंता आहे पण पाटलाच्या मुलाची चिंता नाही, असं म्हणत नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

58 मोर्चे काढणाऱ्या आमच्या मराठा बांधवांनी तो काळ पुन्हा परत आणला पाहिजे. हे गेंड्याच्या कातडीचे लोक आहेत. त्यांना झुकवलंच पाहिजे, असंही नितेश राणेंनी सांगितलं.

राज्यात टाचणी पडली किंवा यांच्या घरात पाणी आले नाही की हे केंद्राकडे बोट दाखवतात, अशी टीका नितेश राणेंनी ठाकरे सरकारवर केलीये.

सगळे सांगत होते केंद्रामुळे मराठा आरक्षण मिळत नाही. संसदेमध्ये एक कायदा पारित केला गेला. त्यात आरक्षण कुठल्या समाजाला किती, कसं द्यायचं, याचे सगळे अधिकार राज्य सरकारचे असल्याचं या कायद्यात नमूद करण्यात आलं, असं ते म्हणालेत.

सुप्रीम कोर्टामध्ये पण या सगळयाची जबाबदारी राज्य सरकारवर दिलेली आहे. या अगोदर राणे समिती स्थापन झाली आघडी सरकारच्या काळात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले गेले. राज्य सरकारला अधिकार दिले, असं त्यांनी सांगितलंय.

राज्य सरकार आपल्या अधिकार चौकटीत आरक्षण देऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये एवढी ताकद दिली होती की, त्यांना केंद्राकडे हात पसरण्याची गरज नाही. एवढी ताकद त्या घटनेत आहे, असंही राणेंनी यावेळी बोलताना सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा 

“2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष करायचाय” 

देवेंद्र फडणवीसांना पाहून काँग्रेसच्या आमदारानं काढला पळ, मोठं कारण आलं समोर 

अण्णा हजारेंनी घेतला अजित पवारांचा धसका?, ‘या’ निर्णयाची रंगलीय खमंग चर्चा

‘हे तर तीन तिघाडा काम बिघाडा सरकार’; पंकजा मुंडेंचा घणाघात