‘या राज्यात नामर्दांचं सरकार आहे’; नितेश राणेंची ठाकरे सरकारवर जहरी टीका

मुंबई | एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवैसी यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून राज्य सरकारला देखील टीकेचा सामना करावा लागत आहे.

ओवैसींनी औरंगाबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानं नव्या वादाला सुरूवात झाली आहे. त्यांच्यासोबत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील देखील उपस्थित होते.

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती जवळ आली असताना आता राज्यात परत एकदा औरंगजेबाच्या नावावरून राजकारण रंगलं आहे.

भाजप नेते व आमदार नितेश राणे यांनी औवैसींच्या दौऱ्यावरून ठाकरे सरकारवर जहरी टीका केली आहे. परिणामी राज्यात वाद निर्माण झाला आहे.

या कारट्या ओवेसीला माहीत आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल. कारण राज्यामध्ये नामर्दांचे सरकार आहे, अशी टीका राणेंनी ठाकरे सरकारवर केली आहे.

याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व, असं म्हणत नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हिंदूत्वावरून डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, नितेश राणेंच्या टीकेनंतर राज्यातील इतर भाजप नेत्यांनी देखील महाविकास आघाडी सरकारला आता औवैसी प्रकरणावरून घेरायला सुरूवात केली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

 रशिया-युक्रेन युद्ध! दोन महिन्यांचं युद्ध, देशांची बंदी तरीही रशिया भक्कम

 ‘मनी लाॅंड्रिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी होणार’; भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

 कोण होणार ‘IPL 2022’ चा बादशहा?, दोन संघ बाहेर पडताच आठ संघांमध्ये चुरस

 ‘किधर छुप्या है अमित ठाकरे…’; दिपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका

“ज्यांना घरातून बाहेर काढलं, त्यांच्यावर काय बोलू?, त्यांची लायकी नाही”