महाराष्ट्र मुंबई

…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा

पुणे | गरीब लोकांसाठी काम करणाऱ्या शिवऋण प्रतिष्ठानच्या अक्षय बोऱ्हाडे या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. जुन्नरच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणावर भाजप नेते नितेश राणे यांनी भाष्य केलं आहे.

तो एकटा नाही हे लक्षात घ्या….आमचं लक्ष आहे. पोलिसांनी कारवाई करावी नाहीतर हर हर महादेव होणारच, असा थेट इशारा नितेश राणे यांनी दिला आहे

अक्षय बोऱ्हाडे सारखा शिवप्रेमी हा आमचा अभिमान आहे. त्याने असंख्य लोकांचे अश्रू पुसले आणि आज त्याच्याच डोळ्यात अश्रू येणं हे मनाला वेदना देणार आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सत्यशील शेरकर यांनी मला त्यांच्या बंगल्यावर नेलं आणि काठीच्या सहाय्याने मारहाण केली. मी पळण्याचा प्रयत्न केला असता बंदूक घेऊन माझ्या मागे लागले आणि मला जीवे मारण्याची धमकी दिली. मला पकडून स्वतःच्या पाया पडयला लावलं तसेच जमीन चाटायला लावली आणि माझ्या पाठीवर तीन काठ्या फोडल्या, असं अक्षय बोऱ्हाडेनं सांगितलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-‘या’ माजी केंद्रीय राज्यमंत्र्याचा राजकीय संन्यास; फेसबुक पोस्ट करत 43 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला रामराम

-काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा; नाना रिंगणात तर बाबांच्या हाती छडी!

-मुख्यमंत्री म्हणजे काही चित्रपटसृष्टीतील हिरो नाही- उद्धव ठाकरे

-होय शेरकर माझे मित्र, नाण्याची एकच बाजू ऐकण्यापेक्षा…- अमोल कोल्हे

-दिलदार शेतकरी! आपल्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना घरी जाण्यासाठी विमानाची तिकीटं दिली काढून