“बाळासाहेबांनतर हिंदूह्रदयसम्राट पदवी देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी”

मुंबई | भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. नितेश राणे मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

खरं म्हटले तर आपण काही लोकं हिंदुह्रदयसम्राट असल्याचे बॅनरसहित फोटो लावतात. पण तुम्ही माझी भावना विचारली तर खरा हिंदूह्रदयसम्राट ही पदवी अगर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनंतर कुणाला द्यायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी असं माझं म्हणणं आहे. कारण त्या एका पत्रकार परिषदेनंतर राष्ट्र आणि राज्य वाचवायचं काम केलंय, असं नितेश राणे म्हणाले.

अहो आपण ज्या राज्यामध्ये फिरतोय, ज्या मुंबईमध्ये राहतोय, तुम्ही तर ज्या मतदार संघात मतदान करताय, राहताय, जगताय तिकडचाच आमदार मंत्री म्हणून जर अंडरवर्ल्डचा दाऊद, त्याच्या सगळ्या लोकांबरोबर व्यवहार करत असेल त्याचे पैसे ठेवत असेल त्याच्या पैशामुळे प्रॉपर्टी घेत असेल आणि त्या प्रॉपर्टीच्या पैसे घेतल्यानंतर मुंबईतून बॉम्ब ब्लास्ट होत असतील तर आपल्या आयुष्याची गॅरेंटी कोण देणार तुम्ही सांगा मला?, असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान,हिंदुह्रदयसम्राट या पदवीविषयी बोलताना त्यांनी मंत्री आणि सध्या अटकेत असलेले नवाब मलिक यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

नवाब मलिक यांच्यावर आरोप करताना त्यांनी त्यांचा आणि दाऊदचा थेट संबंध असल्याचं सांगत आमदार, मंत्री यांचे संबंध जर अंडरवर्ल्डशी असतील तर आपल्या आयुष्याची गॅरेंटी कोण देणार तुम्ही सांगा मला?, असा सवालही नितेश राणेंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“काहींनी सांगितलं मी येणार मी येणार, पण आम्ही काय येऊन देतो का?”

BMC चा नारायण राणेंना दणका! पुन्हा बजावली नोटीस 

  Pune: चप्पल फेकी प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

  पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेक, वाचा काय आहे प्रकरण 

  IPL 2022 चं बिगुल वाजलं: कोणाचा सामना कोणाशी होणार?, वाचा एका क्लिकवर