Top news महाराष्ट्र मुंबई

“संजय राऊत इंटरव्हलनंतर बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार”

मुंबई | प्रभाकर साईल यांच्या व्हिडीओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

शिवसेनेचे खासदास संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपला इशारा दिला होता. वसुली गँग कुणाच्या होत्या. मी सांगितलं ना. इंटरव्हलपर्यंतची गोष्ट नवाब मलिक यांनी सांगितली आहे, इंटरव्हलनंतरची कथा स्क्रिनप्ले मी तुम्हाला सांगेन, असं सांगतानाच या प्रकरणातील तथ्य आणि सत्य धक्कादायक आहे. देशभक्तीचा मुखवटा पांघरून काय होतं त्याची चौकशी झाली पाहिजे, असं राऊत म्हणाले होते. याला आता भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत काल असं बोलले की इंटरव्हलपर्यंत नवाब मलिक आहेत. इंटरव्हलनंतर मी बोलणार. तर त्यांना मी सांगतो की क्लायमेक्स मी करणार, असा इशारा नितेश राणेंनी दिला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

प्रभाकर साईल असेल की नवाब मलिक असतील, ते जे आरोप करत आहेत त्याची शहानिशा तर होणारच आहे. त्यात काही दुमत नाही. शेवटी ते आरोप आहेत, तुम्हाला आरोप सिद्धही करावे लागतात, असं नितेश राणे म्हणाले.

प्रभाकर साईल नावाचा व्यक्ती पुढे येतो. तो कोण होता? काय होता? त्याची पार्श्वभूमी काय? गेल्या 10 – 15 दिवसात तो कुणाशी बोलला? या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत, असंही नितेश राणे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

“आजच्या महिला पुढारलेल्या पण नवाब मलिकांचे आरोप बायकांच्या चोमडेपणासारखे”

“भाजपचा जन्म पवित्र झग्यातून झाला नाही, तुमच्याच अंगावर तुमचंच प्रकरण उलटलंय”

नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर लेटर बॉम्ब; केला मोठा गौप्यस्फोट

दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने दिली ‘ही’ भेट!

येत्या महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार का?; जयंत पाटलांच मोठं वक्तव्य म्हणाले…