सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील प्रचार प्रमुख व शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला. या प्रकरणानंतर भाजप आमदार नितेश राणे चांगलेच अडचणीत आले.
या प्रकरणी मंगळवारी न्यायालयात सुनावणी पार पडली. सरकारी पक्षाचा युक्तीवाद मंगळवारी पुर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे उर्वरित युक्तीवाद आज पार पडणार आहे.
नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. न्यायालयाने नितेश राणेंच्या अंतरिम जामीनाची मागणी फेटाळून लावली असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.
मंगळवारी नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळत न्यायालयाने नितेश राणेंना मोठा झटका दिला. त्यामुळे आजच्या न्यायालयीन प्रक्रियेत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नितेश राणे सध्या गोव्याला गेले असल्याची माहिती पोलीसांना देण्यात आली. त्यामुळे नितेश राणेंचा शोध घेण्यासाठी पोलीसांचं एक पथक गोव्यासाठी रवाना झालं.
पोलीसांचं पथक गोव्याला पोहोचलं पण पोलीसांना नितेश राणेंचा शोध लागला नाही. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय निर्णय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
नितेश राणेंच्या अटकपुर्व जामीनावर आज सुनावणी होणार आहे. ही सुनावणी दुपारच्या सत्रात होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात सखोल मुद्दे मांडण्यासाठी सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयाकडून वेळ मागण्यात आला होता. आज सर्वात प्रथम सरकारी पक्षाचा युक्तीवाद होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 500 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना दिलासा
“तुम्ही माझ्यावर दबाव आणू शकत नाही, पत्रातले धमकीवजा शब्द पाहून मी…”
“1 कोटी दारू पिणाऱ्यांनी आम्हाला मत द्यावं, सत्ता आल्यास आम्ही…”
अजित दादांनी दोन लगावले चार झेलले पण…- संजय राऊत
“एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींच्या जागी स्वत:चा फोटो लावतील”