मोठी बातमी! नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

सिंधुदुर्ग | राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि राणे हा वाद आता नवा नाही. पण हा वाद आता मारहाण आणि वैयक्तिक हल्ल्यांवर गेल्यानं राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. परिणामी सध्या राज्यात शिवसेना आणि राणे यांचीच चर्चा होत आहे.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांच्यावर सध्या शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात अटकेची टांगती तलवार कायम आहे. न्यायालयात राणे यांच्या अटकपुर्व जामीनावर सुनावणी करताना न्यायालयानं हा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीदरम्यान विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. कणकवली भागात परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता.

परब यांच्यावरील हल्ल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालेलं आहे. शिवसेनेनं परब यांच्यावर हल्ला हा नितेश राणे यांनी केल्याची तक्रार दिली होती. अनेक पुराव्यांच्या माध्यमातून सध्या नितेश राणे यांचे पाय या प्रकरणात खोलात जात आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे आणि संदेश सावंत यांच्या अटकपुर्व जामीनावर सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे न्यायालयात राणे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा यासाठी पुरावे देण्यात आले. परिणामी आता कणकवली पोलीस काय कारवाई करतात याकडं लक्ष लागलं आहे.

मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या प्रकरणानं राज्यातील राजकारणात जोरदार टीका टिपण्णी चालू आहे. या प्रकरणातच नारायण राणे यांना चौकशीसाठी बोलावल्यानं भाजपनं सरकारवर टीका केली आहे.

नितेश राणे यांच्या शोधात सध्या कणकवली पोलिसांची विविध पथके फिरत आहेत. राणे हे गोवा किंवा कर्नाटकमध्ये असण्याची शक्यता आहे. परिणामी शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीका केली आहे.

न्यायालयाच्या या सुनावणीनंतर नितेश राणे आता राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोलीस त्यांना कुठल्याही क्षणी अटक करू शकतात. परिणामी राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचं मतदान चालू असतानाच हा निर्णया आल्यानं आता शिवसेनेला दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे. नितेश राणे यांच्या अटकेसाठी सध्या कणकवली पोलीस जोरदार तयारी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

 ‘…तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावावा लागेल’; गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

नितेश राणे यांना धक्क्यावर धक्के! सहकार विभागाकडून मोठी कारवाई

 “नारायण राणेंना नोटीस देऊन बोलावणे हा तर कायदेशीर अपराध”

भारतीय जवानांना मोठं यश; जम्मू-कश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा

“आम्ही मोदींचं अनुकरण करतो, ते मास्क लावत नाहीत म्हणून आम्हीही लावत नाही”