दिलासा नाहीच! नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

मुंबई | भाजप आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यातील आणि शिवसेनेतील वाद आता टोकाला गेला आहे. नितेश राणे यांच्या अटकेची शक्यता आता अधिक तीव्र झाली आहे.

कणकवली भागात शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरण सध्या राज्यात प्रचंड गाजत आहे. संतोष परब यांनी हा हल्ला नितेश राणे यांनी केल्याचा आरोप केला आहे.

नितेश राणे यांनी आपल्याविरोधात कट रचण्यात आल्याचा आरोप केला आहे. पण सध्या कणकवली पोलिसांची पथकं नितेश राणे यांच्या शोधार्थ फिरत आहेत. परिणामी आता काय होणार याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.

संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांच्या अटकपुर्व जामीनावर होणारी सुनावणी न्यायालयानं 30 तारखेपर्यंत पुढं ढकलली आहे. परिणामी नितेश राणे यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम आहे.

निेतेश राणे प्रकरणात सुनावणीदरम्यान कणकवली पोलिसांनी न्यायालयाला सहा फोटो देण्यात आले होते. या फोटोंच्या माध्यमातून या प्रकरणावर प्रकाश पाडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे.

निलेश राणे यांच्या वकीलांनी न्यायालयात जोरदार प्रतिवाद केला आहे. सरकारी वकीलांकडून न्यायालयाचा वेळ घालवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची टीका राणेंच्या वकीलांनी केली आहे.

नितेश राणे यांच्या शोधात सध्या कणकवली पोलीस सर्वत्र पथकं पाठवत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीदेखील या प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. राणे न आल्यानं त्यांच्या घराला नोटीस चिटकवण्यात आली आहे.

दरम्यान, नितेश राणे यांच्यात आणि शिवसेनेत गेल्या काही महिन्यांपासून जोरदार वाद होत आहेत. त्यातच हे परब हल्ला प्रकरण घडल्यानं राणे आणि शिवसेना हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

 31st सेलिब्रेशनसाठी नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नवे निर्बंध

एक स्वप्न साकार झालं! पंकजा मुंडेंनी मानले फडणवीसांचे आभार

 शाळा-काॅलेज पुन्हा बंद होणार?; राजेश टोपे यांचं सुचक वक्तव्य

बाप-लेक अडचणीत! नितेश राणेंनंतर आता नारायण राणेंनाही पोलिसांची नोटीस

नितेश राणेंना अटक होणार?; न्यायालयाचा नितेश राणेंना झटका