नितेश राणेंच्या अडचणी वाढणार?; पोलिसांनी मोठं पाऊल उचललं

मुंबई |  राज्यासह देशाच्या राजकारणात गेल्या काही काळापासून कोकणातील राजकारण गाजत आहे. महाविकास आघाडी आणि राणे यांच्यात राजकीय वर्चस्वाची लढाई चालू आहे.

भाजप आमदार नितेश राणे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांनी सातत्यानं महाविकास आघाडीवर जहरी टीका चालू ठेवली आहे.

राणे यांच्यावर गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक गुन्हे देखील दाखल झाले आहेत. कोकणातील सिंधुदुर्गपासून मुंबईत सायबर सेलपर्यंत गुन्हे दाखल आहेत.

नितेश राणे यांच्यावर दिशा सालियान प्रकरण, संतोष परब प्रकरण, अधिश बंगला प्रकरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. परिणामी मुंबई पोलीस मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत.

आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. परिणामी मालवणी पोलीस कार्यालयाच्या एसीपींनी राणेंना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे, असं मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत पोलीस राणेंकडून एक बाॅन्ड लिहून घेतील, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. एकापेक्षा अधिक जामीनदार या बाॅन्डसाठी लागतील, या बाॅन्डचं उल्लंघन झाल्यास राणेंच्या अटकेची कारवाई होऊ शकते.

नितेश राणे यांनी सातत्यानं ठाकरे आणि पवार कुटुंबीयांवर जहरी टीका केली आहे. परिणामी त्या प्रकरणी देखील त्यांच्यावर आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे अनेक दिवस मोठ्या अडचणीत होते. आता त्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाईचा सामना नितेश राणेंना करावा लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “गेल्या 27 वर्षांपासून मी…”, पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरे भावूक

 मोठी बातमी ! वसंत मोरेंना मनसे पुणे शहरप्रमुख पदावरुन हटवलं

“तुम्ही काय Xपटलं, तुम्ही काय कापलं सांगा?” 

“सोमय्यांची वकिली करण्यापेक्षा फडणवीसांनी त्यांना चार जोडे हाणावेत” 

“देशाच्या स्वातंत्र्यांचा नवा लढा सुरू, आम्ही बलिदान द्यायला तयार”