राजकारण Top news महाराष्ट्र मुंबई

सुशांत प्रकरणी नितेश राणेंचा धक्कादायक गौप्यस्फोट! तपास करणाऱ्या पोलिसांना विचारले ‘हे’ सवाल

nitesh sushant e1605283120621

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानं संपूर्ण देशात खळबळ घातली आहे. सुशांतच्या मृ.त्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीसह देशातील राजकीय वातावरण देखील तापलं आहे. सुशांत प्रकरणामुळे विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षातील नेते यांच्यात आरोप प्रत्यारोप सातत्याने चालू आहेत. अशातच आता भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा या प्रकरणात उडी घेत काही सवाल उपस्थित केले आहेत.

सुशांतच्या मृ.त्यूपूर्वी काही दिवस अगोदर सुशांतची पूर्व मॅनेजर दिशा सालीयनचा मृ.त्यू झाला होता. दिशाच्या मृ.त्यूचा सुशांतच्या मृ.त्यूशी संबंध असल्याचं सातत्याने बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलीस दिशा प्रकरणी तपास करत आहेत.

सध्या या तपासात काहीच संशयजनक आढळत नसल्यानं लवकरंच हा तपास बंद होऊ शकतो, असं बोललं जातं आहे. मात्र, दिशा प्रकरणी सुरू असलेला पोलिसांचा तपास लवकरच बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होताच नितेश राणे यांनी याप्रकरणावर अनेक सवाल उपस्थित केले आहेत. यासंबंधीत त्यांनी काही ट्विट करत प्रश्न विचारले आहेत.

पोलिसांना पुरावे सापडले नाहीत म्हणून दिशा सालीयन प्रकरण बंद केलं जाणार का?, असं असेल तर दोन वेळा तपास अधिकारी का बदलण्यात आले?, रोहन पाटील अद्याप फरार का आहे?, त्या रात्रीनंतर तिच्या इमारतीचा वॉचमेन का गायब आहे?, असे सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केले आहेत.

तसेच त्या रात्रीचे मोबाईल टॉवर लोकेशन तपासण्यात आले का?, तपास करण्यापूर्वीच हे प्रकरण बंद करण्याची घाई पोलिसांना का आहे?, तिचा श.ववि.च्छेदन अहवाल अद्याप का आला नाही?, असेही सवाल नितेश राणे यांनी ट्विटरवरून विचारले आहेत. या ट्विटमध्ये राणे यांनी पोलिसांना देखील इशारा दिला आहे.

यामध्ये नक्कीच काहीतरी काळ बेरं आहे. आम्ही या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष देऊन आहोत. नंतर पुरावे सापडल्यास पोलिसांची नाचक्की होणार नाही, अशी अपेक्षा आहे, असंही नितेश राणे यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, नितेश राणे यांनी यासंबंधीत तिसरं ट्विट देखील केलं आहे. या ट्विटमध्ये राणे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.

फॉरेन्सिक लॅबमधील एका व्यक्तीने मला फॉरेन्सिक रिपोर्ट दाखवले होते. त्यावरून हे आ.त्मह.त्येचं प्रकरण नाही हे स्पष्ट होत आहे. मग पोलिसांना हे प्रकरण लवकर बंद करण्याची एवढी घाई का आहे?, असाही सवाल राणे यांनी विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! लोकप्रिय अॅप ‘ट्वीटर’ लवकरंच भारतात बंद होणार?

‘ते’ प्रकरण अर्जुन रामपालला महागात पडणार! लवकरच होऊ शकते अ.टक?

भाजपला आणखी मोठा झटका! ‘या’ बड्या नेत्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला

‘…तेव्हा किरीट सोमय्यांची बोबडी वळली होती का?’; नाईक कुटुंबियांचा सोमय्या यांना सणसणीत टोला

अर्णव गोस्वामींना दुसरा मोठा झटका! आता ‘या’ प्रकरणी अर्णव गजाआड जाणार?