मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून राज्याच्या राजकारणाचा स्थर खाली गेल्याचं पहायला मिळतं. अनेकदा भाजप नेत्यांनी पातळी सोडून वक्तव्य केली आहे.
अशातच आता एमआयएमने महाविकास आघाडीसोबत युतीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर आता भाजप नते नितेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे.
एमआयएमने लग्नाचा प्रस्ताव तिघांना द्यावा. त्यांनी लग्न करावं आणि हनीमूनही करावा. हा त्यांच्या आपापसातला प्रश्न आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
त्यांनी खुशाल लग्न करून हनीमून करावा. त्यांच्या घरात कोण कोणाबरोबर झोपतो हा आमचा प्रश्न नाही. त्यांचा आपापसातील हा प्रश्न आहे, अशी टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरल्याचं पहायला मिळालं.
भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सरळ आणि स्पष्ट आहोत. येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत भाजप स्वत:च्या ताकदीवरच सत्तेत येणार, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचं स्वप्न देवेंद्र फडणवीस पुर्ण करतील, असंही नितेश राणे यावेळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
Health Tips For Summer: कडक उन्हाळ्यात ‘हे’ 7 पदार्थ नक्की खा… शरीराला आराम मिळेल
स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या प्रदीपचं आनंद महिंद्रांनी केलं तोंडभरून कौतुक, म्हणाले…
Knee pain: कमी वयातच गुडघे दुखतात का?, ही लक्षणं दिसताच वेळीच सावध व्हा
“भाजपला झुंडचा इतका तिरस्कार आणि द कश्मीर फाइल्सचा इतका पुळका का?”
Plane Crash in China: चीनमध्ये मोठा अपघात, 133 जणांसह प्रवासी विमान कोसळलं