पुणे महाराष्ट्र

ज्यांचा इतिहास सांगून मोठे झाले, त्यांनाच बानुगडे पाटलांचं आव्हान?

मुंबई : ज्या घराण्याचा इतिहास सांगून नितीन बानुगडे पाटील यांनी नाव मिळवलं, त्याच घराण्याच्या वारसाविरुद्ध नितीन बानुगडे पाटील आगामी लोकसभेत दोन हात करण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून नितीन बानुगडे पाटील यांना लोकसभेचं तिकीट दिलं जाणार असल्याचं कळतंय. 

सातारा लोकसभेसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नितीन बानुगडे-पाटील यांचं नाव सुचवल्याचं कळतंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यासंदर्भात निर्णय घेणार आहेत.