आव्हाडांना बडतर्फ करा अन्यथा लॉकडाऊन तोडून ठाण्यात घुसू; संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांची धमकी

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एका तरुणाने जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. यामुळे जितेंद्र आव्हाड यांचं नाव चर्चेत असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाही करा अन्यथा नाईलाजास्तव लॉक डाऊन तोडून ठाण्यात दाखल होणार आणि जित्याला धडा शिकवणार, अशी धमकी शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि संभाजी भिडेंचे विश्वासू नितीन चौगुले यांनी दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या बंगल्यावर असा कोणताही प्रकार झाला नाही. या घटनेबद्दल मला माहिती नाही. मी रात्री झोपलेला होतो. त्या दिवशी मी दिवसभर माझ्या विभागात काम करत होतो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे. विरोधक जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत असून सोशल मीडियावरही संताप व्यक्त होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“लोकहो, घरात व्यायाम करा, ज्यांना त्रास आहे त्यांनी खाण्यावर नियंत्रण ठेवा; आपल्याला युद्ध जिंकायचंय”

-…म्हणून भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी केलं अटक

-‘ट्रोलर्सच्या पाठीमागे फडणवीस अन् डावखरे तर नाहीत ना?’; आव्हाड प्रकरणावरून राष्ट्रवादी युवक आक्रमक

-“मुंबई अडीच लाख कोटी केंद्राला देते, त्यातील 25 टक्के महाराष्ट्राला द्या”

-358 तहसील आणि 44 हजार गावं तर एका गावाला किती शिवथाळी??; भाजपचा सवाल