भारतातील मुस्लिमांना बाहेर देशात गेल्यावर हिंदू म्हणूनच ओळखलं जातंं- नितीन गडकरी

नवी दिल्ली | भारतातील मुस्लिमांना बाहेर देशात गेल्यावर हिंदू म्हणूनच ओळखलं जातंं, असं वक्तव्य भाजप नेते नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ नागपुरात मोर्चा काढण्यात आला. यावेळी गडकरी बोलत होते.

पाकिस्तान, बांग्लादेशमधील अल्पसंख्याकांना जेव्हा गरज लागेल तेव्हा भारत मदत करेल असं महात्मा गांधींनी म्हटलं होतं. पाकिस्तानने स्वतःला मुस्लिम राष्ट्र घोषित केलं तेव्हा महात्मा गांधींनी भारत हिंदू राष्ट्र असणार नाही असं घोषित केलं होतं, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये फरक, आमच्या सरकारने 250 कोटी खर्च करुन बांग्लादेशसाठी जलमार्ग बनवून दिला, असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

दरम्यान, मी देशातील मुस्लिमांना आश्वासन देतो, आमच्या संघाच्या गुरुंनी आम्हाला कधीही मुस्लिमांचा द्वेष करायला शिकवला नाही, असंही नितीन गडकरींनी यावेळी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-