पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजचं केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वागत केलं आहे. पंतप्रधानांनी लघु उद्योग, कुटीर उद्योग तसंच ग्रामीण उद्योग दिलेली चालना आणि आधार उद्योग क्षेत्र कधीही विसरणार नाही, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे. संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजने मोठा दिलासा मिळेल, असं ते म्हणाले.
उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या 11 कोटींहून अधिक नागरिकांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. भारत लवकारत लवकर या संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास व्यक्त करताना आर्थिक शक्ती बनू आणि विकासाच्या मार्गावर जाऊ, असंही गडकरी म्हणाले.
देशाच्या अर्थव्यवस्थेत लघु उद्योगाचा वाटा हा 39 टक्क्यांचा आहे. येत्या काळात हे योगदान अधिक वाढेल. या संकटातून बाहेर पडून आपण ऐतिहासिक विकास करू, असं गडकरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-पंतप्रधान मोदींच्या आर्थिक पॅकेजनंतर शेअर बाजार उसळला…!
-“उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन शिथील करण्याची हिम्मत दाखवावी”
-मी पक्षाचं काम सुरू केलं तेव्हा ते चड्डीत मुतायचे- एकनाथ खडसे
-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींचा ‘या’ लोकांना लाभ होणार
-आपल्याला कोरोनाच्या संकटाशी लढायचंय आणि पुढेही जायचं आहे- नरेंद्र मोदी