नवी दिल्ली | भाजपच्या गोटात सध्या राजकीय हालचालिंना वेग आला आहे. एकीकडे त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर नेत्याला हाताशी धरुन शिवसेनेत फोडोफोड केली, तर दुसरीकडे त्यांना बिहारमध्ये नितीश कुमारांनी दणका दिला.
त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय कार्यकारणीत बदल केला आहे. नुकत्याच झालेल्या नवीन कार्यकारणीत जुन्या नेत्यांना वगळून नव्यांची भर टाकण्यात आली. त्यात नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना बाहेरचा रस्त दाखविण्यात आला.
भाजपच्या नवनिर्वाचीत केंद्रीय संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीमध्ये नितीन गडकरी यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे भाजप त्यांचे पंख कापण्याचे काम करत आहे का, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
आता त्यावर नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत एका आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी कुपोषणाच्या मुद्द्यावर आपले मत मांडले.
यावेळी त्यांना जुन्या आठवणींना उजाळा दिल्या ते मनोहर जोशी (Manohar Joshi) मंत्रिमंडळात मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी मेळघाटात अनेक रस्त्यांची कामे केली होती. तसेच त्यावेळी त्यांनी योग्य उपाययोजना केली होती.
त्यांनी ‘माझे मंत्रिपद गेले तरी मला काही फरक पडत नाही’ असे अधिकाऱ्यांना सांगितले होते. मेळघाटील 450 गावांत एकही रस्ता नव्हता. त्यावेळी तेथे वीज देखील नव्हती.
अशा स्थितीत ती जबाबदारी गडकरी यांनी घेतली होती आणि ते सर्व काम माझ्यावर सोडा, असे म्हणत त्यांनी आपले मंत्रिपद गेले तरी चालेल, असा पवित्रा घेत कामे मार्गी लावली होती.
आपण मंत्री असताना देखील जर गरिबांना न्याय देऊ शकलो नाही, तर त्याचा काही उपयोग नाही, असे गडकरी यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
“गुवाहाटी आणि सुरतला तुम्ही काय काय चाळे केले, हे भविष्यात…” अमोल मिटकरींचा पलटवार
“सावरकरांचा अपमान करणाऱ्या बाईला केतकी चितळेसारखी अटक होणार का?” – अभिनेते शरद पोंक्षे
सोनिया गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणार?, अशोक गहलोत म्हणाले
“… नाहीतर मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनला आग लागेल.”, जितेंद्र आव्हाडांनी दिला गंभीर इशारा
“अरे हाड, वो क्या हमको धक्काबुक्की करेंगे, हमने उनको धक्काबुक्की किया!”