नागपूर | भाजपची स्थापना झाल्यानंतर कित्येक वर्षांनी पक्षाला चांगले दिवस आले. पार्टी चालत्या गाडीप्रमाणे आहे. भाजपमध्ये पारिवारिक वातावरण आहे. भाजप हा पक्ष कोण्या एकाच्या मालकीचा नाही. भाजप कधीच जातीपातीचा विचार करत नाही. हा पक्ष सगळ्यांचाच आहे. जुने निष्ठावंत कार्यकर्ते आपल्यात नसतात तेव्हा फार दु:ख होतं. पक्षात कमी कार्यकर्ते असले तरी चालतील पण निष्ठावंत पाहिजे, असं केंद्रिय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.
आनंदराव ठवरे या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा सत्कार नागपुरात आयोजित केला होता. याच कार्यक्रमात गडकरींनी जुन्या आठवणींना उजाळा देत तुफान फटकेबाजी केली. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस तसंच चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते.
पक्षात काड्या करणारे लोक नकोत तसंच इकडून तिकडे उड्या मारणारे लोक देखील नकोत. कमी कार्यकर्ते असतील तरी चालतील पण कार्यकर्ते निष्ठावंत हवेत, असं गडकरी म्हणाले.
भाजपात लोकशाही आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्ते हेच पक्षाचे मालक आहेत. निवडणुकीत हार-जीत होत असते. आता इथून पुढचा काळ संघर्षाचा आहे. कार्यकर्त्यांना पक्ष विस्ताराचं काम मोठ्या प्रमाणावर करावं लागेल, असंही गडकरी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
-गेले 13 वर्ष लतादिदी मला ‘पद्मश्री’ मिळावा म्हणून प्रयत्न करत होत्या- सुरेश वाडकर
-पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा; उद्धव ठाकरे कारवाई करणार का??
-उद्धव ठाकरेंची रामावर श्रद्धा असेल तर त्यात गैर काय आहे?; आव्हाडांनी केली उद्धव ठाकरेंची पाठराखण
-“ईडीची नोटीस आल्यामुळेच राज ठाकरे यांची भूमिका बदलली”
-देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ व्याख्यानावर काँग्रेसचा आक्षेप; शिक्षणमंत्र्यांना धाडलं पत्र