माझा राजकीय वारसदार हा माझा कार्यकर्ता असेल, घरातील कुणी नाही- नितीन गडकरी

नागपूर |  आईवडील राजकारणात असले की ते आपल्या मुलांसाठी उमेदवारी मागतात. पण मला त्या प्रकाराचा तिटकारा आहे. माझा राजकीय वारसदार हा माझा कार्यकर्ता असेल, असं वक्तव्य केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते ‘सहज बोलता बोलता’ या वेब संवादात बोलत होते.

मी आज राजकारणात आहे. पण माझ्या बायको-मुलांनी कधीही मी राजकारणात आहे म्हणून माझ्या नावाचा उपयोग केला नाही. राजकारण सोडून माझ्या सर्व गोष्टींवर तुमचा अधिकार आहे हे मी माझ्या कुटुबियांना सांगितलं आहे. निवडणुकीच्या काळात कुटुंबीय प्रचारासाठी जातात, तेवढाच त्यांचा राजकारणाशी संबंध असल्याचं गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी यांनी या वेबसंवादात लहाणपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तसंच त्यांच्या आईची आठवण जागवली. माझ्या आईमुळेच मी इथपर्यंत पोहचलो. माझ्या आईच्या संस्काराचा माझ्यावर सर्वांत जास्त प्रभाव असल्याचं त्यांनी सांगितलं.

जुन्या काळात संघाला विदर्भ फारसा अनुकूल नव्हता. त्यावेळी आमचे उमेदवार तिथे निवडून यायचे नाहीत. आमचा उमेदवार जवळपास 40 ते 50 हजार मतांनी पराभूत व्हायचा. पण नंतरची स्थित्यांतरे मी पाहिली आहेत. अनेक काँग्रेसच्या लोकांनी भाजपात प्रवेश केला. नंतर नंतर भाजपला विदर्भाची भूमी अनुकुल होत गेली. त्यानंतर आमचा उमेदवार जिथे 50 हजार मतांनी पराभूत व्हायचा आता तिथेच 50 हजार मतांनी विजयी होतो, असं गडकरांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात दिवसेंदिवस वाढती रूग्णसंख्या; महापौरांनी केली अजित पवारांकडे ‘ही’ महत्त्वाची मागणी

-केंद्राने सावकाराचं काम करू नये; मजुरांना कर्जाची नाही तर पैशाची गरज आहे- राहुल गांधी

-10वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; परीक्षेशिवाय 561 जागा भरणार

-राज्यातून 191 ट्रेनद्वारे अडीच लाख परप्रांतीय कामगारांना स्वगृही पाठवलं- अनिल देशमुख

-अरविंद शाळीग्राम यांच्याकडे दिलेला पुणे विद्यापीठाच्या परिक्षा नियंत्रक पदाचा कार्यभार रद्द करा- राजेंद्र विखे