“महापालिकेचे 58 हजार कोटी फिक्स डिपॉझिट तरीही मुंबई दर पावसाळ्यात तुंबते”

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे 58 हजार कोटी बँकेत फिक्स डीपॉझिट आहेत. मात्र तरीही मात्र दर पावसात मुंबई पाण्यात बुडालेली असते, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी लगावला आहे. पालिकेनं मनात आणलं तर मुंबईच्या समुद्रकिनाराही मॉरिशिसप्रमाणेे काचेसारखा होऊ शकतो, नितीन गडकरी म्हणाले आहेत. आंदमान निकोबारनंतर देशांतर्गत भागात पहिलं कांदळवन उद्यान मुंबईत तयार होणार आहे.

पश्चिम उपनगरातील बोरीवलीतील गोवराईत हा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पाचं भूमीपूजन नितीन गडकरींच्या हस्ते करण्यात आलं आहे. यावेळी मंत्री विनोद तावडे, खासदार गोपाळ शेट्टी हेदेखील उपस्थित होते. 

ईटलीतील व्हेनिसप्रमाणे मुंबईत ‘वॉटर टॅक्सी’ सेवा सुरु करायला हवी. त्यातच भविष्य आहे. मी मुंबईत जरी कमी येत असलो तरीही मी मुंबईला मनापासून आपली मानतो, असंही नितीन गडकरी म्हणाले आहेत.

नविन प्रदुषण योजनेमुळे दिल्लीचं प्रदुषण जवळपास 26 टक्के कमी झालं. देवेंद्र फडणवीस जेव्हा नागपूरचे महापौर होते तेव्हा आपापल्या टॉयलेटचं पाणी विकण्याचा प्रकल्प आम्ही प्रत्यक्षात आणला होता. जो आम्ही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमुळे आम्ही नागपूरात महापालिकेचा सर्व घाटा दूर करुन नफा मिळवून दिला, असं गडकरींनी सांगितलं.

दरम्यान, पूर्व किनाऱ्यावरील 850 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्यानाचा प्रकल्प संमत झाला तर खूप मोठी गोष्ट होईल, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-सैफने केलं स्मिता तांबेच्या अभिनयाचं कौतुक; म्हणाला…

-भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी ही नावं चर्चेत; कोणाची लागणार वर्णी???

-इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांचा ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम’ पुरस्कारानं सन्मान

-मी बिकाऊ नाही; भाजपच्या ‘या’ महिला खासदाराचं पंतप्रधानांना ट्वीट

-अरुण जेटलींची प्रकृती गंभीर; राष्ट्रपती घेणार भेट