नागपूर : विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. यावरचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. जहाज बुडाल्यावर जसे उंदीर पळतात, तसे लोक दुसऱ्या पक्षात पळतात, मात्र असे लोक कधीच इतिहास घडवू शकत नाहीत, असा टोला नितीन गडकरी यांनी लगावला आहे.
सत्ता बदलली की लोक पक्ष पण बदलतात, हे बरोबर नाही. मात्र अशावेळी थोडा संयम ठेवला पाहीजे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जावं, असा विचार माझ्या मनात कधीही आला नाही, असंही नितीन गडकरी यांनी सांगितल आहे.
दरम्यान, राजकारणात विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही समस्या असल्याचंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“सगळी पद भोगली आता मुख्यमंत्रिपदाचा विचार करेल” – https://t.co/Ry1Z0vWeGb @raosahebdanve @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019
आज कुलभूषण जाधव यांना मिळणार दूतावासाची मदत – https://t.co/ol5FrUEoeb #KulbhushanJadhav
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019
“शरद पवार तुम्ही 15 वर्षात केलेल्या कामाचा हिशोब द्या” – https://t.co/lijnXjp0UH @AmitShah @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019