“बायको, मेहुणा नाहीतर चहापेक्षा किटली गरम पीए मंत्र्यांना अडचणीत आणतात”

सांगली | मंत्र्यांना बायको किंवा मेहुणा नाहीतर चहापेक्षा किटली गरम असणारा पीए अडचणीत आणतो, असं केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटलं आहे.

सांगलीचे आमदार सुधीर घाडगे यांच्या श्री पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जव्हेरी पेढीचा 190 वा वर्धापन दिन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत सांगलीत पार पडला. त्यानिमित्ताने मंत्री नितिन गडकरी यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

माझ्या घरी खूप चांगले आहे. माझी मुलं राजकारणात नाहीयेत ते कुणाला माझा परिचय सांगत नाहीत. माझी पत्नी आहे तिचं फिल्ड वेगळं आहे. तिच्या कामात मी हस्तक्षेप करत नाही माझ्या कामात ती हस्तक्षेप करत नाही, असं नितीन गडकरींनी सांगितलं.

एकदा चुकून माझा मेव्हणा आला आणि ती म्हणाली याचं काही काम आहे. माझा एक अनुभव आहे की, मंत्र्यांना अडचणीत आणतं कोण? तर बायको नाहीतर मेहुणा आणि नाही तर चहापेक्षा किटली गरम म्हणजे खासगी सचिव, असंही ते म्हणालेत.

मी आणि नरेंद्र मोदी एका विचाराचे आहोत. की, आमदाराच्या पोटातून आमदार तयार झाला नाही, खासदाराच्या पोटातून खासदार तयार झाला नाही पाहिजे. मंत्र्याच्या पोटातून मंत्री तयार झाला नाही पाहिजे. याचा अर्थ असा नाही की, कुणाचा मुलगा आहे म्हणून नाही. जनतेने म्हणावं की याला तिकीट मिळावं तर जरूर द्या पण त्याच्या आई-वडिलांनी म्हणावं की माझ्या मुलाला तिकीट द्या तर नाही. त्यामुळेच भाजपचा अध्यक्ष असताना मी अनेकदा वाईटपणा घेतला, असं गडकरी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

गरिबांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! 

IPL 2022 | श्रेयसच्या KKR ची विजयी सलामी; चेन्नईचा पराभव 

‘सेलिब्रिटी होणं इतकं सोपं नसतं’; हेमांगीनं शेअर केला ‘तो’ व्हिडीओ 

  ‘कुणीही कायदा हातात घेतला तर…’; गृहमंत्र्यांचा गंभीर इशारा 

  “माझ्या हत्येचे कटकारस्थान रचले जात आहे”