नवी दिल्ली| केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी संसदेत मोठी घोषणा केली. नितीन गडकरी यांनी देशभरातील टोलनाक्यांसंदर्भात महत्वाची घोषणा केली असून सरकार पुढील वर्षभरात टोलनाके हटवण्याच्या योजनेवर काम करत असल्याचं त्यांनी संसदेत सांगितलं.
लोकसभेत उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातील बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी महापालिकेच्या टोलचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर प्रतिक्रिया देताना गडकरी म्हणाले की, येत्या वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्यात येतील. टोलच्या जागी GPS यंत्रणा बसवण्यात येईल, सर्व टोलनाके रद्द करण्याच्या योजनेवर सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. लोक रस्तेप्रवास जेवढा करतील, तेवढाच त्यांना टोल द्यावा लागेल, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम सुरु असल्याचं गडकरींनी नमूद केलं.
रशियन सरकारचे मदतीने भारत सरकारने जीपीएस आधारित प्रणाली आणली आहे. जी दोन वर्षात भारत टोलनाकामुक्त करेल. यामुळे टोलनाक्यावर होणारी गर्दी कमी होईल. तसेच टोल नाक्यांच्या देखभालीवर होणार सरकारचा खर्च कमी होणार आहे. असंही गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितलं.
“यापूर्वीच्या सरकारमध्ये रस्ते योजनांच्या कंत्राटात थोडी आणखी मलाई घालण्यासाठी असे काही टोलनाके उभारण्यात आले जे नगरपालिकांच्या सीमेत आहेत. परंतु हे नक्कीच चुकीचं आणि अन्यायकारक आहे,” असं गडकरी म्हणाले.
टोलनाके हटवण्याचा अर्थ हा टोल वसूली बंद करण्यावर नाही तर केवळ टोलनाके हटवणं असा आहे. सरकार सध्या अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे ज्याच्या माध्यमातून वाहन जेव्हा राष्ट्रीय महामार्गावर येईल तेव्हा जीपीएसच्या मदतीनं कॅमेरा तुमच्या वाहनाचा फोटो घेईल. तसंच जेव्हा तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून बाहेर पडाल तेव्हा तुमच्या वाहनाचा फोटो घेतला जाईल. यानुसार वाहन चालकांना तेवढ्याच अंतराचा टोल द्यावा लागणार असल्याचं गडकरींनी सांगितलं.
आता सर्व कमर्शिअल वाहने ही ट्रॅकींग सिस्टिमसहीत येतील. जुन्या वाहनांमध्ये जीपीएस लावण्यासाठी सरकार योजना आखत आहे. जीपीएस टेक्नोलॉजीमुळे नॅशनल हायवे टोलची वसूली 5 वर्षात 1 लाख 34 हजार कोटींनी वाढू शकते. तसेच व्यवहारातही पारदर्शकता येईल.
महत्वाच्या बातम्या –
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नरेंद्र मोदींनी राज्यांना…
‘या’ घटनेमुळे ‘बिग बी’ची मुलगी…
जाणून घ्या! सोन्या-चांदीचे आजचे ताजे दर
“नैतीक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा…
दुबईतील ‘या’ बॅंंकर सोबत मौनी रॉय अडकणार लग्न…