Nitin Gadkari: इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीबाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

नवी दिल्ली | बुधवारी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हायड्रोजनवर चालणाऱ्या कारमधून संसद भवनात पोहोचले. ही कार जपानच्या टोयोटा कंपनीने बनवली आहे.

नितीन गडकरींच्या गाडीची सर्वत्र एकच चर्चा होती. हायड्रोजन हे भविष्याचे इंधन आहे, असं संसद भवनात पोहोचल्यानंतर नितीन गडकरी म्हणाले होते. त्यानंतर आज नितीन गडकरींनी संसदेत मोठं वक्तव्य केलं आहे.

दुचाकी असो, तीनचाकी असो किंवा चारचाकी असो, सर्व इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी होतील. यानंतर देशाची वाहतुकीची दिशा बदलेल. इलेक्ट्रिक वाहने चालवताना पर्यावरणाची काळजी घेतली जाते आणि दुसरे म्हणजे ती चालवण्याचा खर्च खूपच कमी असतो, असं गडकरी म्हणाले.

भारतासारख्या विकसनशील देशात इलेक्ट्रिक वाहनांची किंमत खूप जास्त आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना ते खरेदी करता येत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर देखील नितीन गडकरींनी उत्तर दिलं आहे.

मी सर्व सदस्यांना खात्री देऊ इच्छितो की, येत्या दोन वर्षांत देशातील इलेक्ट्रिक वाहनांची किंमत आजच्या पेट्रोलइतकीच असेल, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

दरम्यान, सर्व चार्जिंग स्टेशन लवकरच तयार होतील, त्यानंतर खासदार इलेक्ट्रिक वाहने खरेदी करू शकतील, असंही नितीन गडकरींनी यावेळी सांगितलं आहे. वीज मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी नोटीस जारी केल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ठाकरे सरकारने दिलं गुडीपाडव्याचं खास गिफ्ट

पुण्यातल्या रस्त्यांवर गाडी चालवत असाल तर सावधान, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ आदेश

Raj Thackeray: “आठवावे रुप…हिंदूस्वरुप!”, राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेचा टीझर रिलीज

Coffee Benefits: काॅफी प्या मस्त रहा! कॉफी पिणाऱ्यांना ‘या’ आजारांचा कमी धोका

Nawab Malik: मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता, कारण…