‘…म्हणून मी राज ठाकरेंच्या घरी गेलो होतो’; गडकरींनी स्पष्टच सांगितलं

मुंबई | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Raut) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (MNS Chief Raj Thackeray) भेट घेतली. दोन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.  रात्री जवळपास 12 वाजण्याच्या सुमारास नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या निवासस्थानातून बाहेर पडले. यानंतर गडकरींनी राज ठाकरेंसोबतच्या भेटीवर भाष्य केलं आहे.

या भेटीत राजकीय चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. पण नितीन गडकरी यांनी ही राजकीय भेट नाही असं म्हटलं आहे.

माझी ही राजकीय भेट नव्हती. माझे राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करायची होती आणि त्यांचे नवं घरंही पहायला त्यांनी मला बोलावलं होतं, असं गडकरी म्हणालेत.

परवा ह्रदयनाथ मंगेशकर यांना पुरस्कार मिळाला तेव्हा राज ठाकरे यांनी म्हटलं, एकदा घरी या. घरही पाहता येईल आणि आईची सुद्धा भेट होईल, असं गडकरींनी सांगितलं.

या भेटीचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. ही भेट पूर्णपणे व्यक्तिगत आणि पारिवारीक भेट होती. या भेटीचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, असं गडकरींनी स्पष्ट केलं आहे.

असलं तरी, गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे महाविकास आघाडी सरकारवर केलेला हल्लाबोल आणि भाजप संदर्भात सॉफ्ट कॉर्नर दिसून आला. येत्या काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे विविध चर्चा रंगत असून या भेटीलाही महत्त्व प्राप्त झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी 

  ‘भाजपला राज ठाकरेंना सोबत घेणं परवडणारं नाही’; रामदास आठवलेंचा हल्लाबोल 

  “शरद पवार यांच्यावर मी Phd करतोय, इतक्या जास्त वयात ते…”

  “देवेंद्रजी, तुम्ही थोडं अडजेस्ट केलं तर….”; काॅंग्रेसचा घणाघात

  “पहिल्यांदा तुमचा मुलगा अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावा”