कोरोनाच्या संदर्भात कॉन्फिडन्स पेट्रोलयमचे अध्यक्ष नितीन खारा यांनी मोदींना केली ही सूचना

नागपूर | कोरोनाबाधित गाव-शहरांसाठी सरकार उपाययोजना करतच आहे. पण कोरोनाचा प्रसार देशभर होऊ नये म्हणून कोरोनाने बाधित नसलेली गाव-शहरे त्वरित सील करावी, अशी सूचना कॉन्फिडन्स पेट्रोलयमचे अध्यक्ष नितीन खारा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरद्वारे केली आहे.

शहरातील मुळ रहिवासींना शहरात जाण्याची परवानगी असेल, बाहेरगावच्या व्यक्तींना एकतर विलगीकरण कक्षात ठेवले जाईल किंवा परत पाठवलं जाईल. कोरोनाबाधित टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्या व्यक्तीला उपचारासाठी पाठविण्यात यावं, असंही खारा यांनी सुचवलं आहे.

अशा पद्धतीने शहरे सील केली तर शाळा, कॉलेज, व्यापार, दुकाने बंद करण्याची आवश्यक्ता राहणार नाही. रोजंदारी कमावणाऱ्या लोकांची रोजीरोटी सुरू राहील आणि बाहेरून येणाऱ्या सर्वांचीच तपासणी झालेली असल्याने कोरोनाबद्दलची भीती राहणार नाही, असं खारा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, खारा यांनी पंतप्रधान आणि सरकार करत असलेल्या उपाययोजनांची प्रशंसा देखील केली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-“…तोपर्यंत विरोधी पक्षाने नाकावरचा मास्क तोंडाला बोळा म्हणून वापरावा”

-जनता कर्फ्यु’च्या दिवशी सर्वच रेल्वे बंद राहणार का?

-महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 52 वरुन 63 वर

-म्हणुन… अ‍ॅपलचे आयफोन्स एकापेक्षा जास्त खरेदी करता येणार नाहीत

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पेट्रोलपंप आजपासून राहणार अर्धावेळ बंद