“ज्यांनी बोलायला पाहिजे ते तर मोदींचे दास झालेत”

मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सातत्यानं जोरदार वाद होताना दिसत आहेत. अशातच आता राज्याचे मंत्री नितीन राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

देशात दलितांचा धाक राहिलेला नाही. केंद्र सरकार लोकशाहीचे स्तंभ हलवण्याची हिंमत करत आहे. यावर बोलण्याची हिंमत कोणीही करत नाही, असं राऊत म्हणाले आहेत.

केंद्र सरकारविरोधात ज्यांनी बोलायला पाहीजे ते तर मोदींचे दास झालेत, अशी टीका राऊतांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि आंबेडकरी नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर केली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले एकत्र येणार असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. त्यामुळे राऊतांच्या टीकेला महत्त्व प्राप्त  झालं आहे.

केंद्र सरकारचं दलितांसोबतच आंबेडकरी समाजाकडं देखील दुर्लक्ष होत आहे. यावर स्वत: आंबेडकरी चळवळीचे नेते मानणारे देखील समोर येत नाहीत, असं राऊत म्हणाले आहेत.

जळगावात भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला नितीन राऊत उपस्थित होते. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना आपल्या पक्षाचं अध्यक्षपद स्विकारण्याची विनंती केली होती. यानंतर वाद वाढला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ‘महिला असलीस तरी छपरीच तू’; राष्ट्रवादीकडून केतकीवर जहरी टीका

“राष्ट्ररक्षणासाठी हिंसा करण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलाय” 

दाऊद इब्राहिम गँगच्या टार्गेटवर कोण?; NIA च्या तपासातून धक्कादायक खुलासा 

खासदाराचा न्यूड व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ! 

‘आज मायेचं छत्र गमावलं’; बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं निधन