मुंबई | राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या मुद्यांवरून ब्राह्मण समाजाला लक्ष्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपण त्या अर्थानं बोललो नसल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
पुरोगामी विचारधारा रुजविण्यासाठी अनेक ब्राम्हण नेते अग्रेसर होते. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. मी याच उद्देशाने वक्तव्य केलं होतं, असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
माझ्या बोलण्याचा रोख हा मनुवाद पाळणाऱ्या संघाकडे होता. त्यात ब्राम्हण समाजाला दुखवण्याचा माझा किंचितही उद्देश नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवावी, असं आव्हान भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं होतं.
पुरोगामी विचारधारा रुजविण्यासाठी अनेक ब्राम्हण नेते अग्रेसर होते त्यांचा आम्हांला अभिमान आहे.
मी याच उद्देशाने वक्तव्य केले होते. त्यातील रोख हा मनुवाद पाळणाऱ्या संघाकडे होता. त्यात ब्राम्हण समाजाला दुखवण्याचा यत्किंचितही उद्देश नव्हता. कुणी गैरसमज करून घेऊ नये ही विनंती!
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) March 15, 2020
महत्वाच्या बातम्या-
-“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकला”
-मध्यप्रदेशमध्ये कोणाचं सरकार, 16 मार्चला फैसला
-जैन समाजाचं कौतुकास्पद पाऊल.. महावीर जयंतीचा कार्यक्रम रदद् करून कोरोनाच्या उपचारासाठी निधी
-कोरोनामुळे होतायेत पाळीव प्राणी बेघर
-“ठरलेल्या तारखेसच होणार सर्व बोर्डांच्या व विद्यापीठांच्या परीक्षा”