मोठी बातमी! बिहारमध्ये नितीश कुमारांचा भाजपला जोर का झटका

मुंबई | बिहार राज्यात भाजप आणि जनता दल (संयुक्त) यांचे युती सरकार होते. जनता दलाचे आणि भाजपचे गेले काही दिवस पटत नव्हते. त्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

जनता दलाचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी राजीनामा दिल्याने बिहारचे आघाडी सरकार कोसळले आहे. याबाबतची घोषणा नितीश कुमार यांनी केली आहे. गेले अनेक दिवस ही युती तुटण्याची शक्यता होती.

आज नितीश कुमार यांनी आपल्या पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांची बैठक घेतली. बैठकी अंती त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे आता बिहार मध्ये देखील महाराष्ट्राची गत झाली आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार हे सायंकाळी 4 वाजता राज्यपाल फागू चव्हाण (Phagu Chauhan) यांना भेटणार आहेत. बैठकीपूर्वीच जनता दलाच्या एका वरिष्ठ नेत्याने स्फोटक बातमीसाठी (Breaking News) तयार राहा, असे म्हंटले होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे भाजप आणि जनता दल यांच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न करत असल्याच्या कुजबुजीनंतर नितीश कुमार आणि केंद्र सरकार यांच्यात तणाव निर्माण होण्यास सुरुवात झाली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या निती आयोगाच्या बैठकीला अनुउपस्थित होते. त्यावेळी ते दिल्लीत असून देखील बैठकीला गेले नाहीत.

तसेच त्यांनी यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते भाजपसोबत असलेली युती तो़डणार अशा चर्चांना उधाण आले होते. आणि आज त्यांनी राजीनामा देत त्याची पुष्टी केली.

दुसरीकडे बिहारचा विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी देखील आपल्या आमदारांची एक बैठक घेतली आहे. त्यामुळे हे दोन पक्ष आता युतीचे सरकार स्थापन करु शकतात.

महत्वाच्या बातम्या – 

‘हे अत्यंत दुर्देवी’, संजय राठोडांना मंत्रिपद मिळताच चित्रा वाघ संतापल्या

शरद पवार, सुप्रिया सुळेंसह अजित पवारांनाही सर्वोच्च न्यायालयाचा दणका

एकीकडे शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, तर दुसरीकडे विनायक राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

मोठी बातमी! ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

पीव्ही सिंधूने रचला इतिहास; भारतासाठी गोल्ड मेडल जिंकलं