बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार?, नितीश कुमार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

पाटना | राजधानी दिल्लीत काल (दि. 07) रोजी निती आयोगाची (NITI Aayog) बैठक पार पडली. यावेळी सर्व राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांचे मुख्यमंत्री (Chief Minister) आणि देशातील उच्च पदस्थ नेते यांनी दिल्लीत बैठकीला हजेरी लावली.

यावेळी भाजपसोबत युतीत असलेले जनता दलाचे बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांची दिल्लीत भेट घेतली. त्यामुळे बिहारमध्ये देखील महाराष्ट्रासारखे सत्तांतर होणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेले कित्येक दिवस नितीश कुमार आणि भाजप यांच्यात वाद होत आहेत. त्यांच्यात सतत खटके उडाल्याचे पहायला मिळते आहे. त्यातच आता कुमारांची अचानक सोनिया गांधी भेट घेतल्याने भाजपची डोकेदुखी तर वाढत नाही ना? अशी परिस्थिती झाली आहे.

निती आयोगाच्या बैठकीला नितीश कुमार राजधानीत उपस्थितीत होते. यावेळी या भेटीगाठी घडल्या. यामुळे आता संयुक्त जनता दलाची आगामी वाटलाच काँग्रेससोबत होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मंगळवारी कुमार याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मंगळवारी नितीश कुमार यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. यावेळी बिहारचे सर्वपक्षीय आमदार आणि खासदार उपस्थित रहाणार आहेत.

त्यानंतर एनडीए सरकार पडून, नितीश कुमार हे राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करणार का? याकडे पाहणे महत्वाचे ठरेल. अलीकडील राजकीय घडामोडीने महाराष्ट्राप्रमाणे बिहारचे देखील राजकारण तापले आहे.

गेले अनेक दिवस कुमार भाजपपासून अलिप्त राहण्याचे पसंत करीत आहेत. त्यांनी 17 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती, त्या बैठकीला कुमारांनी दांडी मारली होती.

त्याचबरोबर 25 जुलै रोजी देशाच्या 15 व्या पंतप्रधान दौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या शपथविधी सोहळ्याला सुद्धा नितीश कुमार गैरहजर होते. काल कुमार दिल्लीत असून देखील ते निती आयोगाच्या बैठकीला गेले नाहीत.

महत्वाच्या बातम्या – 

“चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय”

“उद्धव ठाकरेंसोबत असताना शिंदे शिस्तीत वागायचे, पण आता…”

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं; शिंदेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत

बिग बॉस मराठी 4 होस्ट करण्याबाबत महेश मांजरेकरांचा खुलासा!

मोठी बातमी! संजय राऊतांनंतर आता काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता अडचणीत