नवी दिल्ली | वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत येण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असल्याची कबूली विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेसला पुन्हा एकदा लोकसभेसारख्याच मोठ्या फटक्याला सामोरे जावं लागणार की काय? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
काँग्रेसला वंचितशी आघाडी करायची आहे मात्र त्यांनी अटीच अशा घातल्या आहेत की आघाडी करणं अशक्यच आहे. वंचितला काँग्रेससोबत आघाडी करण्याची इच्छाच नाही, अशी टीका त्यांनी आंबेडकरांवर केली आहे.
राजधानी दिल्लीत आज काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत राज्यातल्या सर्व 288 मतदार संघाचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी मात्र विधानसभेच्या चर्चेसाठी काँग्रेसला 31 ऑगस्टचा अल्टीमेटम दिला आहे. लोकसभेला वंचितच्या मतविभाजनाच्या फटक्यामुळे काँग्रेस अक्षरश: भुईसपाट झालेलं पाहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या-
जसं कलम 370 हटवलं ना… तसं भाजप आरक्षण हटवेल- प्रकाश आंबेडकरhttps://t.co/buTUgDQCBR @Prksh_Ambedkar @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 29, 2019
“मला भाजपात घ्या… म्हणत रामराजे रोज मंत्र्यांचे उंबरे चढतायेत” https://t.co/SG2PWEjOjq @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 29, 2019
बारामतीत अजित पवारांना शह देण्याचा भाजपचा प्रयत्न; ‘या’ मंत्र्याने घेतली बैठक – https://t.co/rFmAYo3RbU @AjitPawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 29, 2019