पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कारवायांचा कलगितुरा रंगला आहे. त्याचबरोबर अनेक नेत्यांवर हल्लेही सुरु असल्याचं पहायला मिळत आहे.
सुरु असलेल्या हल्ल्यांवर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्या केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री किती सुसंस्कृत आहेत. त्यांच्यावर किती हल्ले झाले तरी त्यांनी आपली मराठी आणि भारतीय संस्कृती शाबूत ठेवली. एकही शब्द काढला नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
राणा दाम्पत्यांमुळे राजकारण तापलं असून यानं सर्वसामान्याचे प्रश्न सुटणार आहेत का?, असा प्रश्नही सुप्रिया सुळेंनी केला आहे. या सगळ्यामुळे राज्यातील वातावरण दुषित होत आहे.
माझ्या मतदारसंघात मला इतकी कामं असतात, की मला बाकीचे खासदार काय करतात याचा फारसा अभ्यास नसतोस असंही सुप्रिया सुळेंनी माध्यमांना म्हटलं आहे.
मुंबईतील वातावरण सध्या राणा दाम्पत्यांमुळे जोरदार पेटलं आहे. शिवसेना मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाली आहे.
मातोश्रीवर हनुमान चालीसा पठन करणार असल्याचं राणा दाम्पत्यांनी सांगताच शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
दरम्यान, मुंबईत राडा होऊ नये म्हणून खार पोलिसांनी राणा दाम्पत्यांना 149 ची नोटीस बजावली आहे. नोटीस बजावल्यानंतर आता रवी राणा पत्रकार परिषद घेणार असल्याचं समोर आलं आहे.
थोडक्यात बातम्या –
‘उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेला शनी’; राणा दाम्पत्यांचा हल्लाबोल
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ ! ‘या’ शिवसेना मंत्र्याच्या पीएवर गोळीबार
“शिवसेनेनं आमच्यासोबत बेईमानी केली म्हणून….”; भाजपचा हल्लाबोल
“देशात सध्या एकमेकांना संपवण्याचा कार्यक्रम सुरु आहे”
Corona Update: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ‘या’ ठिकाणी पुन्हा मास्क बंधनकारक