मुंबई | कोरोना (Corona) रूग्णसंख्या सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे आता राज्यात लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये वाढ करण्यात आली आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षीच्या पुर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
आता थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध रहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हिच हिंमत बांधुया, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
आरोग्यदायी आणि समृद्ध महाराष्ट्र त्याचबरोबर बलशाली भारत बनवू. नववर्ष सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराटीचं जावो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
नववर्षाचं स्वागत करताना सर्वांनी कोरोना संकटाचं भान राखावं, त्यामुळे गर्दी करू नका, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. आपल्या वागण्यातून संसर्ग वाढणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
नवीन वर्ष आपल्याला नवनवीन संकल्प करण्यासाठी प्रोत्साहन देतं. नववर्ष उमेदीने उभं राहतं. त्यामुळे आपण आव्हानांवर मात करण्यासाठी सज्ज होतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.
आपल्याला आव्हांना तोंड देऊन त्याच्या छाताडावर उभं राहून यशाला गवासणी घालायची आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात परिस्थिती आणखी बिघडू शकते, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता टेन्शन देखील वाढतं आहे.
महत्वाच्या बातम्या –
भिर्रर्र चा नाद घुमणार! ‘या’ ठिकाणी पार पडणार अधिकृत बैलगाडा शर्यत
“अज्ञानी, अशिक्षित, तिरस्करणीय…”, सोनम कपूरची मुनगंटीवारांवर जोरदार टीका
चिमुकल्यानं उचलली चिठ्ठी अन् निकालच फिरला, शिवसेनेला मोठा धक्का
सतीश सावंतांच्या पराभवानंतर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर, ‘ती’ पहिली पोस्ट व्हायरल
‘धरणमूत्र पवार ओकून गेले,अख्खी चिवसेना ओकत होती पण…’; निलेश राणेंचा हल्लाबोल