राज्यातील ओमिक्रॉन रूग्णसंख्येबद्दल ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर

मुंबई | दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभर थैमान घालायला सुरूवात केली आहे. ओमिक्रॉनबाधित रूग्णांची वाढती आकडेवारी धडकी भरवणारी आहे.

भारतातील 14 पेक्षा जास्त राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला. देशात सर्वात जास्त ओमिक्रॉनबाधित रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.

महाराष्ट्रात ओमिक्रॉनबाधित रूग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. तर कोरोनाबाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. राज्यात तिसऱ्या लटेची चिंता व्यक्त केली जात असताना ओमिक्रॉन रूग्णांबद्दल दिलासादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना शुक्रवारी राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा एकही रूग्ण आढळला नाही. राज्यात आतापर्यंत 876 ओमिक्रॉनबाधित रूग्णांची नोंद झाली आहे.

राज्यातील एकुण ओमिक्रॉनबाधितांपैकी 435 रूग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत. शुक्रवारी राज्यात एकही नव्या ओमिक्रॉनबाधित रूग्णांची नोंद न झाल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे.

राज्यात गेल्या पाच दिवसातच कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. 31 डिसेंबर 2021 ला 8067 वर असलेली कोरोनाबाधितांची संख्या आता 40 हजारांच्या पुढे गेली आहे.

रोज वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. राज्याचा मृत्यूदर आता 2.07 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. तर राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.8 टक्के आहे.

दरम्यान, राज्यात सर्वात जास्त कोरोनाबाधित रूग्ण मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राज्यात शुक्रवारी 40 हजार 925 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. मात्र, एकही नव्या ओमिक्रॉनबाधित रूग्णाची नोंद झाली नाही.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ 5 पेनी स्टॉक्सने दिले जबरदस्त रिटर्न्स; फक्त 5 दिवसात गुंतवणूकदार मालामाल

Corona Alert! गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत मोठी वाढ; वाचा आकडेवारी

“नाना पटोले यांच्यावर कारवाई करा, त्यांना…”, चंद्रकांत पाटलांची आक्रमक मागणी

नाचत नाचत आला अन् आमदाराला कानाखाली मारून गेला; व्हिडीओ तुफान व्हायरल

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात गेल्या 6 वर्षातील सर्वात मोठी वार्षिक घट