मुंबई | भाजप नेते नितेश राणे यांनी आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात संबोधित करत असताना नितेश राणे यांची पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
कितीही एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करा आता मागे हटणार नाही, आता आर-पारची लढाई लढू, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
यावेळी नितेश राणे यांनी खालच्या स्तरावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मानेला उगाचं पट्टा लागला नाही. सोनिया गांधीसमोर वाकून वाकून त्यांच्या मानेला पट्टा लागला असल्याची घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली आहे.
‘ठाकरे आडनाव लावून कोणी बाळासाहेब होत नाही, त्यासाठी रक्तही असावं लागतं, आता तुमचं रक्त तपासण्याची वेळ आणू नका’, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
आपण जे आंदोलन करत आहात मला आश्चर्य वाटते. मुख्यमंत्र्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाली आहे. ते बरे असल्याची माहिती आहे. आमच्याही शुभेच्छा आहेत, असंही ते म्हणाले.
परंतु, डॉक्टरांनी एक संशोधन केलं आहे या माणसाला कणा आहे का, हे पहायला मुख्यमंत्र्यांच्या मानेला उगाच पट्टा लागलेला नाही. सोनिया गांधीसमोर वाकून वाकून लागला आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
परिवहन खातं शिवसेनेकडे आहे, या कालावधीत तुम्हा काय केलें, असा प्रश्न उपस्थित करत अनिल परब यांना नितेश राणे यांनी चिमटे काढले आहेत.
या लोकांना विलिनीकरण नको आहे याचं कारण वायफाय असो किंवा टायरच्या किंमतीमध्ये कमिशन कसं खाणार? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी केला आहे.
एसटीचं तर राज्यशासनात विलीनीकरण झाले तर अनिल परब वसुली कशी करणार? असंही नितेश राणे यांनी अनिल परब यांना उद्देशुन म्हटलं आहे.
नवाब मलिक अतिरेक्यांना मदत करणारे देशद्रोही आहेत. त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी,अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हिंदुत्व म्हणजे मुस्लीम किंवा…’; राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; ‘या’ मुद्द्यावर होणार गंभीर चर्चा
“फुट पाडण्याचा प्रयत्न केला तर याद राखा गाठ नितेश राणेशी आहे”
“नवाब मलिक हा गद्दार, त्याला पाकिस्तानला पाठवा”
अनिल देशमुखांना मोठा धक्का! ईडी कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ