कुणालाही वाटलं नव्हतं, मात्र फक्त 20 धावा करुनही ‘हा’ विक्रम क्रुणाल पांड्यांच्या नावावर!

नवी दिल्ली | आयपीएलच्या २०२० च्या १३ व्या मोसमातील १७ वा सामना काल दुपारी पार पडला. हा आयपीएल सामना शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना पार पडला.

शारजाह क्रिकेट स्टेडियमला षटकारांचा गड म्हणतात, या वर्षीच्या आयपीएल मोसमातील बरचसे सामने इथे खेळले गेले. प्रत्येक संघ या छोट्या मैदानावर २०० पेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करत होते. तब्बल सहा सामन्यांपासून प्रत्येक संघाचा हा प्रयत्न चालू होता.

पण काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने २०० धावा केल्या. एवढ्या धावा मुंबई इंडियन्स संघाला क्रुणाल पांड्यांच्या मदतीने करता आल्या. खुद्द मुंबई इंडियन्सच्या संघाला वाटले नव्हते की, ते २०० धावा करू शकतील, पण हे क्रुणाल पांड्या या खेळाडूने शक्य करून दाखवलं आहे.

जेव्हा मुंबई इंडियन्स संघाचा क्रुणाल पांड्यांच्या अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या खेळायला आला. तेव्हा मुंबई इंडियन्स संघाच्या १९.२ षटकांमध्ये ५ विकेट पडल्या होत्या. शेवटचे केवळ चार चेंडू क्रुणाल पांड्या याला खेळायला मिळाले.

त्यावेळी मुंबई इंडियन्स संघाच्या १८८ धावा होत्या. पण क्रुणाल पांड्या याने चार चेंडूत २ षटकार आणि २ चौकार मारले. यामुळे संघाच्या धावा २०० धावांच्या पुढे जाऊन पोहोचल्या. क्रुणाल पांड्या याने केवळ चार चेंडूत वीस धावा केल्या आणि नाबाद राहिले.

तसेच या सामन्यात क्रुणाल पांड्या याने आयपीएलमध्ये एका डावात सर्वात जलद धावा करण्याचा विक्रम केला आहे. डाव्या हाताचे फलंदाज क्रुणाल पांड्या हे २० धावा करणारे पहिले खेळाडू ठरले आहे. कालच्या सामन्यात क्रुणाल पांड्या यांचा स्ट्राईक रेट तब्बल ५०० चा होता.

एका डावात ३ चेंडूमध्ये १० आणि त्यापेक्षा जास्त धावा करण्यानंतर हा सर्वात उत्तम स्ट्राईक रेट आहे. या धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने २० षटकात ५ विकेट गमावून २०८ धावा केल्या. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाच्या खेळाडूंनी १४ षटकार आणि १५ चौकार मारले.

यामध्ये क्विंटन डिकॉक यांनी चार षटकार आणि चार चौकार मारले. किरण पोलार्ड यांनी तीन षटकार मारले. ईशान किशन यांनी एक चौकार आणि दोन षटकार, हार्दिक पंड्या आणि क्रुणाल पांड्या या खेळाडूंनी प्रत्येकी दोन चौकार आणि दोन षटकार मारले. तसेच रोहित शर्मा यांनी एक षटकार मारला.

महत्त्वाच्या बातम्या-

डेविड वॉर्नरनं असा भीमपराक्रम केलाय, रोहित-विराटसारखे दिग्गजही जवळपास नाहीत!

“सुशांतला धमकावत त्याच्यावर बला.त्काराचे आरोप केले जात होते”

पहिल्या महिंद्रा थारची बोली पोहोचली 1.10 कोटीवर; का लावत आहेत लोक एवढी बोली?

‘टॉप’वर पोहचण्यासाठी अनेक हिरोईननी केलं ‘हे’ काम; ईशा कोप्पिकरचा धक्कादायक खुलासा

सुशांत प्रकरणी अखेर मौन सोडत प्रसून जोशी यांनी दिली महत्वाची माहिती म्हणाले…