“संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही”

मुंबई | संजय राऊत नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी वरूण गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत आणि वरुण गांधीच्या भेटीनं राजकीय वर्तुळात खळबळ सुरु होती. या भेटीवर अनेक प्रतिक्रिया येत होत्या.

वरुण गांधी यांच्यासोबत ही एक सदिच्छा भेट होती. आम्ही अनेक विषयावर चर्चा केली, असं संजय राऊत यांनी सांगतिलं.

कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता हैं…, असं ट्वीट करत यापुढे आपलं उत्तर हे मौन असणार असल्याचं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

राऊतांच्या या ट्विटवर भाजपनं अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. संजय राऊत यांनी थोडा उशीर केला अशाप्रकारच्या टोला भाजपकडून लगावण्यात येत आहे.

संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही. कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेली माणसं आहोत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना ही वाघाची गर्जना आहे आणि वाघ कधी मौनात जात नाही. आम्ही कमी बोलल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी किंवा राजकीय विरोधकांनी आनंद साजरा केला असेल, असंही राऊत म्हणाले.

भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहेस कारण मी जेवढं कमी बोलेन तेवढं त्यांना सोयीचं आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपचे लोक ज्या पद्धतीने द्वेषाने, सुडाने आणि बदल्याच्या भावनेने वागतात तसं शिवसेना कधी वागत नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण…” 

  1 एप्रिलपासून कोरोना निर्बंध हटवणार?; ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय

  मोठी बातमी! कोरोनामुळे ‘या’ जिल्ह्यात 15 दिवसांची जमावबंदी

  “आशिष शेलारांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडतायेत”; शिवसेनेचा पलटवार

  Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेल महागलं, वाचा ताजे दर