ख्रिस गेलनं आयपीएलमध्ये रचला नवीन इतिहास! कोणीही न करू शकलेला विक्रम करून दाखवला

नवी दिल्ली | किंग्ज इलेव्हन पंजाबचे कर्णधार केएल राहुल याने यावेळी संघात काही बदल केले आहेत. मात्र, एका फलंदाजामुळे संघाचे भविष्यच बदलले, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. ख्रिस गेल हा फलंदाज आयपीएलच्या या पर्वात पंजाबकडून खेळत आहे.

ख्रिस गेलने आयपीएलच्या या पर्वत हैराण करणाऱ्या खेळाचे प्रदर्शन केले आहे. ख्रिस गेलने केलेल्या खेळाचे प्रदर्शन अन्य कोणताही खेळाडू करू शकलेला नाही. मंगळवारी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आयपीएलचा 38वा सामना पार पडला.

हा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ख्रिस गेलनं तुषार देशपांडे याच्या एका षटकात 26 धावा काढल्या. केवळ 6 चेंडूत त्याने 26 धावा त्याने केल्या होत्या. यात त्याने 2 षटकार आणि 3 चौकार मारले आहेत.

ख्रिस गेलने असा खेळ पहिल्यांदा केलेला नाही. याआधीही त्याने अनेकवेळा असा खेळ खेळला आहे. तुम्ही ऐकून हैराण व्हाल की, आयपीएलमध्ये एका षटकात 25 आणि त्यापेक्षा जास्त धावा करणारा हा एकमेव खेळाडू आहे.

युनिव्हर्स बॉस या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू म्हणून ख्रिस गेल याची ओळख आहे. डाव्या हाताने फटकेबाजी करणाऱ्या ख्रिस गेल याने आयपीएलच्या इतिहासात तब्बल सात वेळा असा विक्रम केलेला आहे. आतापर्यंत कोणताही खेळाडू 2 पेक्षा जास्त वेळा असा विक्रम करू शकलेला नाही. ख्रिस गेल याने एका षटकात काढलेल्या धावांमुळे संघाला त्याचा खूपच फायदा झाला आहे.

165 धावांचे लक्ष गाठतांना पंजाब संघाने चार षटकात 24 धावा करून 1 बळी गमावला होता. मग यातच पाचव्या षटकात ख्रिस गेल याने 26 धावा काढल्या. त्यामुळे संघाची धावसंख्या 50 झाली. या धावा संघाच्या खूपच उपयोगात आल्या आणि संघाने विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘भाजपनं माझं विधानसभेचं तिकीट नाकारलं तेव्हाच राष्ट्रवादीनं मला…’; पक्ष सोडताच खडसेंचा गौप्यस्फोट

“एकनाथ खडसे तेव्हा आम्हाला शिव्या घालत होते” – शरद पवार

सामन्यात पराभव पत्कारूनही धोनीनं विरोधी टीमच्या खेळाडूला दिलं ‘हे’ गिफ्ट; वाचा काय आहे यामागील कारण

भाजपला आणखी मोठा धक्का! खडसेंनंतर आता भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याही राष्ट्रवादीत जाणार

काय सांगता! बिस्किटांची चव ओळखण्यासाठी ‘ही’ कंपनी देतेय तब्बल 40 लाख रुपये