“घाबरायचं काही कारण नाही, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देणार नाही”

मुंबई | राज्याच्या राजकारणात 2019 ला इतिहास घडला होता. कायम एकत्र असणारे शिवसेना आणि भाजपनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं.

दोन महिन्याच्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद चांगलाच गाजत आहे.

भाजपने वारंवार सरकार पडणार असल्याचं भाकित केलं आणि दरवेळी वेगवेगळ्या तारखा दिल्या. त्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई केल्याने आता पुन्हा शरद पवार राजकारणात सक्रिय झाल्याचं पहायला मिळत आहे.

राज्याच्या राजकारणाच्या विविध मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि तक्रारी शरद पवारांना सांगितल्या. सिल्वर ओकवर जवळपास दोन तास ही बैठक चालली.

बैठक झाल्यानंतर शरद पवारांनी दोन्ही मुठी घट्ट करून घाबरण्याचं काही कारण नाही. मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देत नाही, असा आत्मविश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.

अनेक नकारात्मक गोष्टी असल्या, तरी त्यांच्या नेत्यांकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत, असा सकारात्मक दृष्टीकोन शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.

दरम्यान, सामाजिक कामकाजात रूची घ्या, सदस्यांना पुढं आणा हे आणि यासारखे अनेक कानमंत्र देखील पवारांनी यावेळी दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

31 मार्चच्या आधी ‘ही’ 5 कामं आटपून घ्या; नाहीतर मोठं नुकसान होईल

आर्चीचा फोटो पाहून परश्या दिवाना, अशी कमेंट केली की… झाले सगळेच सैराट

 नोकरीची सुवर्णसंधी! ‘ही’ प्रसिद्ध IT कंपनी देणार तब्बल 60 हजार भारतीयांना नोकरी

 Deltacron: डेल्टाक्राॅनमुळं टेन्शन वाढलं! जाणून घ्या किती धोकादायक आणि काय आहेत लक्षणं?

राज्यपालांचा ठाकरे सरकारला दणका! विशेषाधिकार वापरत रद्द केला ‘तो’ मोठा निर्णय