मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीच्या ठिणगीचा आता वणवा पेटला आहे. एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदारांना सोबत घेत बंड पुकारल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
एकनाथ शिंदे व शिंदे गटातील नाराज आमदारांच्या मनधरनीचे अनेक निष्फळ प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आले. मात्र, बंडखोर आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरेंनी भावनिक साद घालूनही शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यात शिंदे गटाने त्यांचं नाव शिवसेना-बाळासाहेब ठाकरे ठरवल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता शिवसेनाही बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक झाल्याचं दिसत आहे.
शिवसेनेची कार्यकारणीची बैठक आज पार पडली. या बैठकीत आज महत्त्वाचे 6 ठराव मंजूर झाले. या ठरावांमध्ये 2 राजकीय ठरावांचा देखील समावेश आहे.
या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राऊतांनी या ठरावांची माहिती दिली असून बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.
कुठलाही गद्दार बाळासाहेबांचं नाव वापरू शकत नाही. मतं मागायची असतील तर तुमच्या बापाच्या नावाने मागा, शिवसेनेच्या बापाच्या नावाने नाही, असा घणाघात संजय राऊतांनी केला.
दरम्यान, शिवसेना बाळासाहेबांची आहे व रहाणार. तर शिवसेना कायम बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचाराला धरून असेल असंही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू
उद्धव ठाकरेंना मोठा झटका! शिंदे गटाचं नाव ठरलं?
महाविकास आघाडीची शिवसेना आमदारांवर मोठी कारवाई, एकनाथ शिंदे म्हणतात…
सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी होणार?
“तुम्ही आमचे सहा नगरसेवक नेले, शिंदेंनी तुमचे 36 आमदार नेले, आता कसं वाटतंय?”