‘नो व्हॅक्सिन नो जॉब’; ‘या’ कंपनीने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली | गेल्या दीड वर्षापासून जगावर कोरोनाचं (Coronavirus) संकट आहे. गेल्या काही महिन्यांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी होत असल्यामुळे कोरोनाचं संकट टळलं असं वाटत होतं; मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हॅरिएंट असलेल्या ओमायक्रॉन विषाणूने डोकं वर काढलं आहे.

कोरोनाचा नवा व्हॅरिएंट असलेल्या ओमायक्रॉनने (Omicron) चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग अधिक गतीने होत असल्याचं दिसून येत आहे. दे देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याचं आरोग्य विभागामार्फत वारंवार सांगण्यात येत आहे. अशात लसीकरणासाठी एका खासगी कंपनी पुढाकार घेतला असून, त्यांनी आपल्या पॉलिसीमध्ये बदल केला आहे. नो व्हॅक्सिन नो जॉब असे धोरण कंपनीने आता जाहीर केलं आहे.

सीटीग्रुप असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी बँकिंग क्षेत्रामध्ये काम करते. कंपनीच्या नव्या धोरणानुसार कर्मचाऱ्यांना येत्या 14 जानेवारीपर्यंत लस घेण्यास सांगण्यात आले आहे.

जे कर्मचारी 14 जानेवारीपर्यंत लस घेणार नाहीत, त्यांना कामावरून काढून टाकण्यात येईल असा इशार कंपनीच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.

देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाला आळा घालायचा असेल तर लसीकरण हा एकमेव उपाय आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने देखील वारंवार लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संबंधित कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान,केवळ ओमिक्रॉनच (Omicron) नाही तर देशात कोरोनाचे रुग्णही वाढत आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 27 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळल्यानंतर आता कोविडच्या तिसऱ्या लाटेची (Corona Third Wave) भीती निर्माण झाली आहे.

इतकंच नाही तर तज्ज्ञांनी असंही म्हटलं आहे की, ज्यांना कोरोनाची लस मिळालेली नाही त्यांच्यासाठी ओमिक्रॉन त्रासदायक ठरू शकतो.

महत्वाच्या बातम्या-

सावधान! Omicron ची लागण झालेल्या रूग्णांमध्ये दिसतायेत ‘ही’ गंभीर लक्षणं 

…म्हणून गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण -एकनाथ खडसे

Corona | कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर ‘या’ गोष्टी सर्वात आधी करा

आपल्याला लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचं नाही- उद्धव ठाकरे

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; आता इतक्या जणांच्या उपस्थितीत उरकावं लागणार लग्न