सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांचा एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. सावंतवाडी विश्रामगृहावर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या एका आढावा बैठकतील हा फोटो असल्याचा दावा करण्यात येत आहे. दीपक केसरकर हे बैठकीत बोलत असताना जिल्हाधिकारी पांढरपट्टे खुर्चीवर पाय ताणून झोप काढत असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या वर्तनाची सिंधुदुर्गमध्ये जोरदार टिका होत आहे. तसंच राज्यभरात हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. बैठकीतच झोप घेत असलेला जिल्ह्याधिकाऱ्यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर पालकमंत्री दीपक केसरकर हेदेखील अडचणीत आले आहेत.
पालकमंत्री असलेल्या केसरकरांचा प्रशासनावर जराही वचक उरला नाही का?, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.विधानसभा निवडणुकीच्या आधी आता या फोटोवरून दीपक केसरकरांवर विरोधकांकडून निशाना साधला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सिंधुदुर्गमध्ये एका हवालदाराला जास्त किंमत आहे, पण गृह राज्य मंत्री दीपक केसरकराला कोणी विचारत नाही. सिंधुदुर्गला 10 वर्ष मागे घेऊन जायचं काम ह्या काही उपयोग नसलेल्या केसरकरांनी केले आहे, असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
“काश्मीरमध्ये राहत असलेल्या माझ्या सासू-सासऱ्यांसोबत गेल्या 22 दिवसांपासून बोलणं झालं नाही” https://t.co/rUWw47F7zO #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 30, 2019
…म्हणून माझा शिवसेनेला पाठिंबा- जितेंद्र आव्हाड – https://t.co/Bm8px0Dy0d @ShivSena @Awhadspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 30, 2019
रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांचं झालं होतं दोनदा लग्न- https://t.co/U6WbHNI2H9 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 30, 2019