सभागृहात गदारोळ! ‘बेशरम सरकार’च्या घोषणा देत भाजप आमदारांचा गोंधळ

मुंबई | गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशवनाची (winter season maharashtra 2021) सांगता झाली आहे. विविध मुद्द्यावरून हे अधिवेशन गाजलं होतं.

अधिवेशनाचा पहिला दिवस शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या नक्कलवरून गाजलं होतं. त्यानंतर गेली 4 दिवस अधिवेशन व्यवस्थित पार पडलं.

राज्यातील अनेक मुद्द्यावरून या अधिवेशनात चर्चा रंगली. विरोधी पक्ष भाजपने आरोपाची फेऱ्या झाडल्या होत्या. त्याला ठाकरे सरकारने उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

अशातच आधिवेशनाची सांगता गदारोळात झाल्याचं पहायला मिळालं आहे. विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून सभागृहात प्रचंड गोंधळ पाहण्यास मिळाला.

विद्यापीठ सुधारणा विधेयक मांडल्यानंतर सभागृहात गोंधळ पहायला मिळाला. त्यावेळी भाजप आमदारांनी हे बेशरम सरकार असल्याची घोषणा घेत चांगलाच गोंधळ घातला.

या गोंधळातच विधेयक राज्य सरकारने पारित करून घेतलं आहे.  त्यामुळे ठाकरे सरकारचा धिक्कार असो, असं म्हणत भाजप आमदारांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर विधानसभेबाहेर देखील देवेंद्र फडणवीसांनी घणाघाती टीका केली आहे.

आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या लोकशाहीचला काळा दिवस आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हे घाबरट आणि पळपुटं सरकार असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे.

विद्यापीठ विधेयकावर चर्चा सुरू असताना चुकीच्या पद्धतीने कामकाज रेटलं गेलंय, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. सरकार विद्यापीठांवर कब्जा करू पाहत आहे. त्यामुळे आता भाजप आंदोलन करणार असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

भाजपचे आमदार फुटणार???, नाना पटोलेंचे सुचक संकेत

जेल मिळणार की बेल मिळणार? नितेश राणेंचे वकील म्हणतात…

भाजपचे आमदार फुटणार???, नाना पटोलेंचे सुचक संकेत

MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली

काल रात्री नेमकं काय घडलं?, रोहिणी खडसेंनी सांगितला थरारक अनुभव