मुंबई | भारतीय सिनेसृष्टीत करिअर करण्याचं स्वप्न घेऊन अनेकजण स्वप्नांची नगरी असणाऱ्या मुंबईत येतात. अनेकजण यशस्वी देखील होतात.
प्रत्येक यशस्वी चेहऱ्यामागं त्याचा संघर्षाचा एक काळ उभा असतो. सध्याच्या घडीला बाॅलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून नोरा फतेहीला ओळखण्यात येतं.
सुरूवातीच्या काळात नोरानं देखील मोठा संघर्ष केला आहे. नोराची ओळख सध्या प्रसिद्ध बोल्ड अभिनेत्री अशी आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील वाढत आहे.
सध्या सोशल मीडियावर द व्हायरल व्हिडीओज चॅनलवर नोराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. नोराच्या सुरूवातीच्या काळातील प्रवासाचा हा व्हिडीओ आहे.
सदरील व्हिडीओत नोरा आपली ओळख करून देत आहे. तिच्या हातात एक बोर्ड आहे. पांढऱ्या रंगाच्या या बोर्डवर नोराबद्दलची माहिती लिहीली आहे.
नोरानं या व्हिडीओत आपल्या कला सादर केल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालताना दिसत आहे. सर्वत्र याच व्हिडीओची चर्चा आहे.
नोरा या व्हिडीओत आपलं वय 20 वर्ष असल्याचं सांगत आहे. सुरूवातीच्या काळात नोरानं देखील ऑडिशन करून आपल्या करिअरची सुरूवात केली आहे.
दरम्यान, गेल्या काही काळापासून भारतीय सिनेमामध्ये आयटम साॅंगचा बोलबाला आहे. सर्वात जास्त प्रमाणात नोरा फतेहीच्या आयटम साॅंगला पसंती मिळत असल्याचं दिसत आहे.
पाहा व्हिडीओ –
महत्त्वाच्या बातम्या –
ममता बॅनर्जी शाळकरी विद्यार्थ्यांबाबत घेणार ‘हा’ मोठा निर्णय
“30 वर्षांनी तुमच्या मुलींना पण हिजाब घालावा लागेल”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
Weather Update: पुढील 12 तास धोक्याचे, ‘या’ भागात कोसळणार पाऊस
…म्हणून रात्री बारा वाजता खांद्याला बॅग लटकवून रस्त्यावर धावत होता मुलगा, पाहा व्हिडीओ
पेट्रोल डिझेलच्या दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर