मुंबई | काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली.
या निवडणुकीत काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपने सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांना उमेदवारी दिली होती.
सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरुवात झाली असून 26 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. सतेज पाटलांच्या कसबा बावड्यातून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
सरनोबतवाडी इथल्या शासकीय गोदामात ही प्रक्रिया पार पडत असून यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेस आणि भाजप यांच्यात प्रामुख्याने ही लढत झाली. अत्यंत चुरशीने याची प्रचार प्रक्रिया दोन्ही बाजूंनी राबवली गेली आहे.
उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून हा निकाल राजकीय पक्षांसाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आगामी महानगरपालिका निवडणुकांत या निवडणुकीचा परिणाम दिसण्याची दाट शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“हम तो डुबेंगे सनम, तुमको भी ले डुबेंगे”
नवरा जेलमध्ये, पत्नीला हवंय मूल; न्यायालयानं दिला मोठा निर्णय
Multibagger penny stock | ‘या’ शेअरचा धुमाकूळ, गुंतवणुकदार मालामाल
“जर कोणी भारताला छेडलं तर त्याला आम्ही सोडणार नाही”
“पप्पू आणि बबली काँग्रेसमध्ये राहतील तोपर्यंत…”, भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य