लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | केंद्र सरकारने केवळ 50 जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करण्यास परवानगी दिली आहे. जर 50 पेक्षा जास्त लोक लग्न समारंभात आढळले, तर लग्नासाठी परवानगी मागणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

मार्च ते मे हे महिने म्हणजे लग्नाचा हंगाम असतो. या तीन महिन्यात अनेक लग्नसमारंभ होत असतात. मात्र लॉकडाऊनमुळे या तीनही महिन्यात अनेक लग्न रखडली होती. सर्व गोष्टींचा विचार करुन लग्न समारंभासाठी केंद्र सरकारने काही नियमावली बनवली आहे.

50 लोकांना लग्नात उपस्थित राहण्याची परवानगी दिली असली, तरी सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन करण्यासही केंद्राने बजावलं आहे. केंद्र सरकारने नियमांसह लग्नसमारंभाना परवानगी दिली आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई होणार आहे.

दरम्यान, सरकारने अंत्ययात्रेसाठीही नियम ठरवून दिले आहेत. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, अंत्ययात्रेत केवळ 20 लोकच सहभागी होऊ शकतील. त्यापेक्षा जास्त लोकांनी अंत्ययात्रेत हजेरी लावू नये, असं केंद्र सरकारने बजावलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“आघाडीचं सरकार चालवणं ही तारेवरची कसरत आहे”

-‘दारुला परवानगी, मॉर्निंग वॉकला का नाही?’; पुण्यातील रहिवाशाचं आयुक्तांना पत्र

-‘अनुजने माझी मान अभिमानाने उंचावली’; शहीद मेजर अनुज सूद यांना अखेरचा निरोप

-दारूची होम डिलिव्हरी मिळणार; ‘या’ सरकारनं घेतला निर्णय

-मुंबईत IPS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण; राज्यभरात 457 पोलिसांना कोरोना