CDS बिपिन रावतच नाही तर ‘या’ दिग्गजांनीही विमान अपघातात गमवालाय आपला जीव

नवी दिल्ली | तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर (Army Chopper Crash) आज कोसळलं. या दुर्घटनेत देशाचे माजी लष्करप्रमुख बिपीन रावत (Bipin Rawat) आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर तामिळनाडूतील कुन्नूरच्या जंगलात दुर्घटनाग्रस्त झाले. मात्र विमान अपघातात एखादं मोठं व्यक्तिमत्त्व बळी पडण्याची ही पहिलीच वेळ नाही.

याआधीही अनेक बडे राजकारणी विमान अपघातांना बळी पडले आहेत. आंध्र प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले वायएस राजशेखर रेड्डी यांचा 2009 मध्ये रुद्रकोंडा हिल येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. रेड्डी हे काँग्रेसमधील सर्वात प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक होते आणि त्यांनी 2009 मध्ये पक्षाला पुन्हा सत्तेत येण्यास मदत केली होती.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव सिंधिया यांचा सप्टेंबर 2001 मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला होता. सिंधिया आणि इतर सहा जणांना घेऊन जाणारे खाजगी विमानमोहन हे आधी कम्युनिस्ट पक्षाचे होते पण नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

अरुणाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री नातुंग यांचा मे 2001 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. राज्यात EMRS (एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल) मॉडेल सुरू करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता.

लोकसभेचे अध्यक्ष GMC बालयोगी यांचा 03 मार्च 2002 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कैकालूर येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता.

विमान अपघातात पंजाबचे राज्यपाल सुरेंद्र नाथ आणि त्यांच्या कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला होता. 9 जुलै 1994 रोजी हिमाचल प्रदेशात सरकारी विमान कोसळलं होतं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे धाकटे पुत्र संजय गांधी यांचा जून 1980 मध्ये दिल्लीत विमान अपघातात मृत्यू झाला.

महत्त्वाच्या बातम्या- 

लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपीन रावत यांचं दुर्दैवी निधन! 

बँक ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी; शक्तिकांत दास यांनी केली ‘ही’ घोषणा 

“शरद पवार यांच्या उंचीचा नेता आज देशाच्या राजकारणात नाही” 

‘हा नेता अनिल देशमुखांच्या वाटेनं जाणार’; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ 

Royal Enfield ची धमाकेदार बाईक लाँच; 2 मिनिटांत लागला SOLD OUT चा बोर्ड