फक्त सुशांतच नाही तर रियाही गांजा ओढायची; पाहा कुणी केला हा धक्कादायक खुलासा

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सर्वोच्च न्यायालयानं सुशांत सिंह राजपूत प्रकरण सीबीआयच्या हाती सोपविलं असून सीबीआय याप्रकरणी अतिशय वेगानं तपास करत आहे. सुशांतचे कुटुंबीय, सुशांतचे स्नेही तसेच सुशांतचे मित्र वेगवेगळ्या माध्यमातून याप्रकरणी अनेक खुलासे करत आहेत.

सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या मोबाईल मधील ड्र.ग्ज विषयीचं व्हाट्सअॅप चॅट समोर आल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसुद्धा याप्रकरणी तपास करत आहे. अशातच आता सुशांत आणि रियाची मॅनेजर श्रुती मोदी हिने सुशांतप्रकरणी सीबीआयसमोर धक्कादायक खुलासा केला आहे. फक्त सुशांतच नाही तर रिया देखील गां.जा ओढायची, असा खुलासा श्रुतीनं केला आहे.

रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत दोघे एकत्र गां.जा घेत असत. सुशांत आणि रिया अनेकदा गां.जा ओढण्यासाठी टेरेसवर जायचे. तसेच रिया तिचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडासोबत देखील स्मोक करायची, अशी माहिती श्रुती मोदीनं दिली आहे.

ड्र.ग्ज सुशांतच्या आयुष्यातील खूप महत्वाचा भाग होता. सुशांत ड्र.ग्जच्या खूप जास्त आहारी गेला होता. रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक आणि त्यांचे कर्मचारी ड्र.ग्जमध्ये पूर्णपणे गुंतले होते. तसेच श्रुती मोदीलाही या सर्व गोष्टींचा भाग बनण्यास जबरदस्ती केली जायची, अशीही माहिती श्रुतीनं दिली आहे.

ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एका टीमनं आज सकाळी लवकर रियाच्या घरी छापा टाकला आहे. तसेच ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची दुसरी टीम सॅम्युअल मिरांडाच्या घरी दाखल झाली असून चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, एनसीबीनं ड्र.ग्ज संबंधित व्यापारात ज्या आरोपीला अटक केलं आहे. त्याच्यासोबत रिया व तिचा भाऊ शौविक थेट संबंधात असल्याचं बोललं जात आहे. अं.मली पदार्थांच सेवन आणि व्यापार या आरोपाखाली रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला केव्हाही अटक केली जावू शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावामधील धक्कादायक चॅटिंग आलं समोर, पाहा काय आहे चॅट

सुशांतप्रकरणी मोठी बातमी! रियाच्या घरी छापा टाकत ‘या’ व्यक्तीला एनसीबीनं घेतलं ताब्यात

एकट्याने गाडी किंवा सायकल चालवताना मास्क घालणे बंधनकारक आहे का?

आधी बेड मिळाला नाही, नंतर पार्थिवाची हेळसांड; पुण्याच्या माजी महापौराचा दुर्दैवी शेवट!

“सुशांतप्रकरणी भाजपचं तोंड काळं होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे”