काही लोकांनी माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना केली पण…- अमित शहा

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटवरुन आपली प्रकृती ठणठणीत असल्याचं सांगत कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन केलं आहे. ट्विटवरुन त्यांनी एक निवेदन पोस्ट केलं असून त्यामधून त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांनाही सुनावलं आहे.

अमित शहा यांच्या प्रकृतीसंदर्भात मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरु होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट केलं आहे. माझ्या तब्ब्येतीसंदर्भात सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. काही लोकांनी तर माझा मृत्यू व्हावा म्हणून ट्विट करुन प्रार्थनाही केली अशी सुरुवात करत अमित शाह यांनी कामात व्यस्त असल्याने आपण या अफवांकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे.

देश सध्या कोरोनासारख्या जागतिक महारोगाशी लढा देत आहे. देशाचा गृहमंत्री म्हणून मी रात्रंदिवस माझ्या कामात व्यस्त असल्याने मी या गोष्टींकडे फारसे लक्ष दिलं नाही. जेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली तेव्हा मी विचार केला की हे सर्व लोक त्यांच्या काल्पनिक आनंदामध्ये जगत आहेत, असं अमित शहा म्हणाले.

दरम्यान, माझ्या तब्बेतीबद्दल चिंता करणाऱ्या आणि विचारपूस करणाऱ्या माझ्या सर्व शुभचिंतकांचे आणि कार्यकर्त्याचे आभार मानतो, असं ट्विट शहांनी केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-“गुजरातमधून कोरोना हद्दपार करायचा असेल, तर मुख्यमंत्र्यांना हटवा”

-नागरिकांनो घाबरू नका; भारत कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार-डॉ. हर्षवर्धन

-विधानपरिषद उमेदवारीबाबत शशिकांत शिंदे यांचा मोठा खुलासा

-“ज्या मुंबईने आम्हाला पोसलंय, तिला संकटकाळात सोडून जाणार नाही”

-चीनकडे कोरोनाचा फैलाव रोखण्याची क्षमताच नव्हती- डोनाल्ड ट्रम्प